balwad bridge under rain water
sakal
वेल्हे, (पुणे) - राजगड तालुक्यातील दुर्गम तोरणा गड व पासली भागात गेल्या तीन ते चार दिवसापासून कोसळत असलेल्या पावसाने ओढ्या नाल्यांना पूर आला आहे. पासली- भोर रस्त्यावरील तोरणा गडाच्या पायथ्याशी असलेल्या बालवड (ता. राजगड) येथील पूल पाण्याखाली गेला असल्याने विद्यार्थ्यांची शाळा बंद झाली असून स्थानिक रहिवाशांना अनेक अडचणींना तोंड द्यावे लागत आहेत.