MP Medha Kulkarni
sakal
पुणे - महाराष्ट्राची सांस्कृतिक राजधानी असलेल्या पुण्यात गणेशोत्सवाचा आदर्श 'पुणे पॅटर्न' राबवण्याची गरज आहे. उत्सवातील डीजे, लेझर लाइट आणि अश्लीलतेवर कडक बंदी घालावी, अशी मागणी राज्यसभा खासदार मेधा कुलकर्णी यांनी आज केली. कायद्याची अंमलबजावणी कोणत्याही जाती-धर्माच्या उत्सवासाठी समान असावी, असेही त्यांनी नमूद केले.