esakal | पर्यटनासाठी खडकवासल्यापुढे जाण्यास बंदी; पोलिसांचा बंदोबस्त
sakal

बोलून बातमी शोधा

पर्यटनासाठी खडकवासल्यापुढे जाण्यास बंदी; पोलिसांचा बंदोबस्त

पर्यटनासाठी खडकवासल्यापुढे जाण्यास बंदी; पोलिसांचा बंदोबस्त

sakal_logo
By
निलेश बोरुडे

किरकटवाडी : जिल्हाधिकारी डॉ. राजेश देशमुख यांनी काल दि. 16 जुलै 2021 रोजी पुणे (Pune) जिल्ह्यातील पर्यटन स्थळे, धरणांचा परिसर, गड किल्ले आदी ठिकाणी नागरिकांची सुरक्षितता, कायदा आणि सुव्यवस्था राखण्यासाठी कलम 144 लागू केले, असताना बेफिकीर पर्यटकांनी मात्र खडकवासला (khadakwasla) परिसरात गर्दी केलेली दिसली. हवेली (haveli) पोलीसांनी (police) खडकवासला धरणापासून (khadakwasla Dam) पुढे जाऊ न देता पर्यटकांना परतावून लावण्यासाठी मोठा फौजफाटा तैनात केला आहे. नियम मोडून आलेल्या पर्यटकांवर पोलीसांकडून दंडात्मक कारवाई करण्यात येत आहे. (Ban going beyond khadakwasla Dam tourism Police coverage)

कोरोना प्रतिबंधात्मक उपाययोजना म्हणून पर्यटनस्थाळांवर होणारी गर्दी टाळण्यासाठी जिल्हाधिकाऱ्यांनी निर्बंध अधिक कडक करत कलम 144 लागू केले. हवेली तालुक्यातील खडकवासला धरण (khadakwasla Dam), डोणजे, घेरा सिंहगड, सिंहगड किल्ला (sinhagad fort) या ठिकाणांसाठी हा आदेश लागू आहे. सदर आदेशाची अंमलबजावणी करण्यासाठी हवेली पोलीसांनी खडकवासला धरण (khadakwasla Dam) चौपाटीवर कडक नाकाबंदी केली आहे.

हेही वाचा: पाय घसरून विहिरीत पडले आजोबा, अग्निशमन दलानं वाचवले प्राण

पोलीसांना सहन करावा लागतोय मनःस्ताप

नाकाबंदीच्या ठिकाणी विचारपूस करण्यासाठी वाहणे थांबवली जात असल्याने वाहनांची मोठी रांग लागत आहे. त्यातच काही पर्यटक रांगेत न थांबता मधेच गाडी घालत असल्याने वाहतुक कोंडी निर्माण होत आहे. परिणामी पर्यटकांवर कारवाई करताना त्याचबरोबर वाहतूक सुरळीत ठेवण्याची कसरत करत वाद घालणाऱ्या पर्यटकांना तोंड देताना पोलीसांना मनःस्ताप सहन करावा लागत आहे.

हेही वाचा: खडकवासला धरणातून खरिपाचे पहिले आवर्तन सुरू

आतापर्यंत 45 हजार रूपयांचा दंड वसुल

यासंदर्भात बोलताना हवेली पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक सदाशिव शेलार म्हणाले, "शहरी हद्दीत कसलीही तपासणी होत नसल्याने पर्यटक बिनदिक्कत ग्रामीण हद्दीत येत आहेत. मोठ्या प्रमाणात वाहने येत असल्याने व पर्यायी रस्ता नसल्याने वाहतूक कोंडी होत आहे. सकाळपासून 89 वाहनांवर कारवाई करण्यात आली असून सुमारे 45 हजार रुपये दंड वसूल करण्यात आला आहे. उद्याही पर्यटकांवर कारवाई करण्यात येणार आहे. कोणीही नियम मोडून येऊ नये."

loading image