esakal | खडकवासला धरणातून खरिपाचे पहिले आवर्तन सुरू
sakal

बोलून बातमी शोधा

खडकवासला धरणातून खरिपाचे पहिले आवर्तन सुरू

खडकवासला धरणातून खरिपाचे पहिले आवर्तन सुरू

sakal_logo
By
राजेंद्रकृष्ण कापसे : सकाळ वृत्तसेवा

खडकवासला : हवेली, दौंड, इंदापूर, बारामती तालुक्यातील शेतीसाठीचे यावर्षीच्या खरीप हंगामातील खडकवासला धरणाच्या कालव्यातील पहिले आवर्तन (पाळी) सोडले आहे. असे खडकवासला पाटबंधारे विभागाचे कार्यकारी अभियंता विजय पाटील यांनी सांगितले.

टेमघरसह पानशेत, वरसगाव धरण क्षेत्रात १२ व १३ जुलै रोजी चांगला पाऊस पडला होता. परंतु त्यानंतर पावसाचा जोर कमी झाला आहे. पण मागील चार दिवसात पडलेल्या पावसामुळे सुमारे धरणात अर्धा टीएमसी पाणीसाठा वाढला आहे. असे सांगून पाटील म्हणाले की, धरणातून गुरुवारी सुरवातीला ८०० क्यूसेकने पाणी कालव्यात सोडले. त्यानंतर आज सकाळी एक हजार क्यूसेकने सोडण्यात येत आहे.

हेही वाचा: चाकणमध्ये सैराट! मुलीला पळवून नेल्याच्या रागात दोघांचा खून

कालव्यात पाणी सोडण्यासाठी, पानशेत मधून ५६०क्यूसेक व वरसगाव धरणातून ६०० क्यूसेक असे एक हजार ०६० क्यूसेक पाणी खडकवासला धरणात जमा होत आहे. चार ही धरणातील सध्याच्या उपयुक्त पाणीसाठा साडेनऊ टीएमसी म्हणजे ३२.७५ टीएमसी पाणीसाठा शिल्लक आहे. हे आवर्तन सुमारे महिनाभर सुरू राहिल. साडेनऊ टीएमसी पैकी सुमारे चार टीएमसी पाणी खरिपाच्या आवर्तनासाठी आवश्यक असते. उर्वरित साडेपाच टीएमसी पाणी पुणे शहर परिसर आला पिण्यासाठी पुढील चार महिने पुरेल एवढा पाणीसाठा आहे. मागील वर्षी नऊ जुलै २०२१ रोजी कालव्याच खरीप पहिले आवर्तन सोडले होते. त्यावेळी धरणात ७.५४ टीएमसी म्हणजे २५.९०टक्के पाणीसाठा जमा होता. मागील वर्षीपेक्षा यंदा धरणात एक टीएमसी पाणीसाठा जास्त आहे.

हेही वाचा: प्रवाशांना दिलासा! सोमवारपासून पुर्णा-अकोला डेमू लोकल रेल्वे धावणार

शनिवारी सकाळी सहा वाजता चार ही धरणातील पाणी साठ्याची स्थिती :

धरणाचे नाव- एकूण क्षमता (टीएमसी) / उपयुक्त साठा (टीएमसी) / टक्केवारी

खडकवासला- १.९७ / ०.६७ / ३३.७१

पानशेत- १०.६५ / ४.३६/ ४०.९७

वरसगाव- १२.८२ / ३.८३ / २९.८७

टेमघर- ३.७१ / ०.७३ / १९.७८

चार धरणात एकूण- २९.१५ / ९.५९ / ३२.९०

loading image