esakal | शिवजयंती कार्यक्रमावरील 'बंदी'चा फतवा मागे घ्या; संभाजी ब्रिगेडची मागणी
sakal

बोलून बातमी शोधा

Shiv-Jayanti

शिवजयंतीच्या कार्यक्रमातून समता, समानता आणि बंधुता प्रस्थापित केली जाते.

शिवजयंती कार्यक्रमावरील 'बंदी'चा फतवा मागे घ्या; संभाजी ब्रिगेडची मागणी

sakal_logo
By
सकाळ वृत्तसेवा

पुणे : राज्य सरकारने कोरोनाचे कारण पुढे करीत 'शिवजयंती' कार्यक्रम रद्द करण्याचा निर्णय घेतला आहे. या निर्णयाचा निषेध व्यक्त करीत तो मागे घ्यावा, अशी मागणी संभाजी ब्रिगेडच्यावतीने करण्यात आली आहे. 

काँग्रेस आणि शिवसेनेचे नेते महाराष्ट्रभर कार्यक्रम घेत आहेत. राष्ट्रवादी काँग्रेसचा जयंत पाटील यांच्या नेतृत्वाखाली महाराष्ट्रभर संवाद दौरा चालू आहे. भाजपचे सर्व राष्ट्रीय नेते महाराष्ट्र, पश्चिम बंगालसह देशभर फिरत आहेत. त्यांच्या कार्यक्रमाला परवानगी मिळते, मात्र शिवजयंतीच्या कार्यक्रमावर बंदी घातली जाते. पदवीधर आणि ग्रामपंचायतीच्या निवडणुका झाल्या. मग शिवजयंतीच्या कार्यक्रमावर बंदी का? असा प्रश्न संभाजी ब्रिगेडने केला आहे. 

पुण्यातील नवले पुलाचा मुद्दा पोचला संसदेत; खासदार सुप्रिया सुळेंनी उपस्थित केले प्रश्न​

शिवजयंतीच्या कार्यक्रमातून समता, समानता आणि बंधुता प्रस्थापित केली जाते. सगळ्यांना सोबत घेऊन कार्यक्रम केले जातात. एक चांगला संदेश समाजामध्ये देण्याचा प्रयत्न प्रत्येक शिवप्रेमी करतो. अशा कार्यक्रमावर राज्य सरकार बंदी घालत असल्यास ही बाब निषेधार्ह आहे. सरकारने काढलेला फतवा तत्काळ पाठीमागे घेऊन शिवजयंतीच्या कार्यक्रमाला परवानगी द्यावी. वेळ पडल्यास मिरवणुका रद्द कराव्यात. मात्र कार्यक्रम झाले पाहिजेत, अशी संभाजी ब्रिगेडची मागणी आहे. सरकारने शिवप्रेमींच्या भावनांचा आदर करून तत्काळ परवानगी द्यावी, असे मत संभाजी ब्रिगेडचे प्रदेश संघटक संतोष शिंदे यांनी व्यक्त केले.

- पुण्याच्या बातम्या वाचण्यासाठी येथे ► क्लिक करा

(Edited by: Ashish N. Kadam)