

Court Grants Permission To Bandu Andekar and Associates for PMC Elections
पुणे : नातू आयुष कोमकर खूनप्रकरणात न्यायालयीन कोठडीत असलेला कुख्यात बंडू आंदेकर, त्याची भावजय माजी नगरसेविका लक्ष्मी आंदेकर आणि माजी नगसेवक वनराज आंदेकरची पत्नी सोनाली आंदेकरला पुणे महानगरपालिकेची आगामी निवडणूक लढविण्यासाठी येथील विशेष 'मकोका' न्यायालयाने परवानगी दिली आहे. विशेष न्यायाधीश एस. आर. साळुंखे यांनी याबाबतचा आदेश दिला. राष्ट्रवादी काँग्रेसचे माजी नगरसेवक वनराज आंदेकरच्या खून प्रकरणात अटक आरोपी गणेश कोमकरचा मुलगा आयुष याचा पाच सप्टेंबरला गोळ्या घालून खून करण्यात आला.