bandu andekar
sakal
पुणे
Pune Crime : युवकांकडून संघटित गुन्हेगारी घडवण्यात बंडू आंदेकरचा हातखंडा
आयुष कोमकर खूनप्रकरणातील आरोपींनी संगनमत करून कट रचत हा गुन्हा केला आहे. या गुन्ह्यातील सात आरोपी हे १९ ते २५ वर्षे वयोगटातील आहेत.
पुणे - आयुष कोमकर खूनप्रकरणातील आरोपींनी संगनमत करून कट रचत हा गुन्हा केला आहे. या गुन्ह्यातील सात आरोपी हे १९ ते २५ वर्षे वयोगटातील आहेत. या गुन्ह्यात अटक केलेला कुख्यात गुंड सूर्यकांत ऊर्फ बंडू आंदेकर याचा युवकांकडून संघटित गुन्हेगारी घडवण्यात हातखंडा आहे. आयुषचा खून पिस्तूल वापरून करण्यात आला आहे. त्यामुळे हेतू आणि कट या दोन महत्त्वाच्या मुद्यांवर सखोल तपास करणे आवश्यक आहे, अशी माहिती पोलिसांनी सोमवारी (ता. १५) न्यायालयात दिली.