

Baner Balewadi Garbage Depot Cleared
esakal
बालेवाडी : येथील साई चौक, आर. के. लक्ष्मण मेट्रो स्टेशनजवळील मोठ्या कचरा डेपोचा प्रश्न अखेर मार्गी लागला आहे. बाणेर-बालेवाडी नागरिक मंचाने (BBNM) बीबीएनएम या प्रश्नावर २८ नोव्हेंबर २०२६ रोजी उपोषण करण्याचा इशारा दिला होता. मात्र, महापालिका प्रशासनाने तातडीने कार्यवाही करत गेल्या दहा दिवसांत सुमारे ७० टन कचरा उचलून परिसर स्वच्छ केला. या प्रश्नावर ‘सकाळ’नेही सातत्याने पाठपुरावा करत वारंवार बातम्यांच्या माध्यमातून प्रशासनाचे लक्ष वेधले होते. नागरिकांच्या तक्रारी आणि ‘सकाळ’च्या वृत्तांची दखल घेत अखेर प्रशासनाने कारवाई केली.