

Baner footpath encroachment creating inconvenience
Sakal
बालेवाडी : बाणेरमधील डी- मार्टसमोरील पदपथ आणि सायकल मार्गावर फेरीवाले व खाद्यपदार्थ विक्रेत्यांनी बस्तान मांडले आहे. त्यामुळे ग्राहकदेखील वस्तू, खाद्यपदार्थ खरेदीसाठी त्यांच्याकडे गर्दी करतात. परिणामी पदपथ व्यापला जात असून इतर पादचाऱ्यांना अडचण होत असल्याने भर रस्त्यावरूनच चालावे लागते. त्यामुळे प्रशासनाने हा पदपथ त्वरित मोकळा करण्याची मागणी या भागातील नागरिक करत आहेत. मुंबई- बंगळूर महामार्गालगत महाळुंगे- बाणेर रस्ता येथे हे डी-मार्ट असल्याने नेहमीच नागरिकांची वर्दळ असते.