Baner Mahalunge Route : बाणेर-म्हाळुंगे मार्गाकडे प्रशासनाचे दुर्लक्ष; खड्ड्यांचा अंदाज येत नसल्यामुळे अपघात

बाणेरमधील बाणेर-म्हाळुंगे रस्त्यावर सध्या हिंजवडी ते शिवाजीनगर मेट्रोमार्गाचे काम सुरू आहे. या कामासाठी रस्त्याच्या मध्यभागी अवरोधक लावलेले आहे.
Baner Mahalunge Route
Baner Mahalunge Routesakal
Updated on

बालेवाडी - बाणेरमधील बाणेर-म्हाळुंगे रस्त्यावर सध्या हिंजवडी ते शिवाजीनगर मेट्रोमार्गाचे काम सुरू आहे. या कामासाठी रस्त्याच्या मध्यभागी अवरोधक लावलेले आहे. जिथे काम झाले आहे, तेथील अवरोधक आतील बाजूला घेतले आहेत. परंतु त्यानंतर त्या ठिकाणी दुरुस्ती केलेली नाही. त्यामुळे रस्त्याची चाळण झालीू असून महापालिका प्रशासनाने याकडे लक्ष देऊन त्वरित या रस्त्याचे काम करावे, अशी मागणी या भागातील नागरिक करत आहेत.

पावसाळ्यापूर्वी रस्ता दुरुस्त करणे अपेक्षित होते. मात्र आता रस्त्यावर अनेक ठिकाणी चढ-उतार व खड्डे असल्‍याने पावसाचे पाणी खड्ड्यांत साचते व वाहनचालकांना खड्ड्यांचा अंदाज येत नाही, परिणामी येथे अनेक लहान-मोठे अपघात होत आहेत.

बाणेर-म्हाळुंगे रस्त्यावर नेहमीच वर्दळ असते. पुणे शहराकडून मुंबई-बंगळूर महामार्गाकडे जाण्यासाठी नागरिक हाच रस्ता वापरतात. त्यात हा रस्ता व्हीआयपी म्हणूनही ओळखला जातो. परंतु सध्या येथे मेट्रोचे काम सुरू असल्यामुळे या रस्त्याची चाळण झाली आहे. तसेच हा रस्ता अरुंदही झाला आहे. येथे वारंवार होणाऱ्या वाहतूक कोंडीमुळे नागरिक आधीच मेटाकुटीस आले आहेत. त्यातच हा रस्ता आता खाली-वर होऊन ठिकठिकाणी खड्डे पडल्याने वाहनचालकांना चांगलीच कसरत करावी लागत आहे.

रस्त्यावर अनेक ठिकाणी खडी आणि वाळूही पसरली आहे. आता पावसाळा सुरू झाल्याने या रस्त्यावर पडलेल्या खड्ड्यांमध्ये पावसाचे पाणी साचत आहे. त्यामुळे वाहनचालकांना खड्ड्यांचा अंदाज येत नसल्याने किरकोळ स्वरूपाचे अपघात होत आहेत. तर काही ठिकाणी रस्त्याची एका बाजूची कड वर आल्यामुळे दुचाकीस्वार त्यावरून घसरत आहेत. काही ठिकाणी तात्पुरते डांबर टाकून खड्डे बुजविले आहेत, मात्र ते कामही व्यवस्‍थित नसल्यामुळे त्याचा त्रासही दुचाकीस्वारांना सहन करावा लगत आहे. त्यामुळे महापालिका प्रशासनाने या रस्त्याची त्वरित दुरुस्ती करावी, अशी मागणी नागरिकांकडून होत आहे.

रस्त्यावरील खड्डे बुजविण्याची कामे तर पावसाळ्यापूर्वीच होणे गरजेचे आहे. हा व्हीआयपी रस्ता असूनही या रस्त्याची सध्या दुरवस्था झालेली आहे. वाळूवरून घसरून व खड्ड्यांमध्ये आदळल्याने दुचाकीस्वारांचे अपघात होत आहेत. तरी प्रशासनाने याकडे गांभीर्याने लक्ष देऊन येथील कामे त्वरित करून घ्यावीत.

- प्रीती सूर्यवंशी, स्थानिक नागरिक. बाणेर

संबंधित खात्याच्या अधिकाऱ्यांना या रस्त्याची पाहणी करून येथील समस्यांवर उपाययोजना करण्यास सांगितले जाईल. या रस्त्याचे काम त्वरित केले जाईल.

- गिरीश दापकेकर, सहाय्यक आयुक्त, औंध-बाणेर क्षेत्रीय कार्यालय

पीएमआरडीएला या संदर्भात वारंवार सूचना दिलेल्या आहेत. तरी पाठपुरावा करून हे काम त्वरित करून घेण्यात येईल.

- मकरंद वाडेकर, उपअभियंता, महापालिका

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.