Baner Firing : बाणेर येथे दुर्गा कॅफेजवळ गोळीबार; एक तरुण जखमी, आरोपीने स्वतःला गोळी मारून संपवले जीवन

बाणेर येथे जुपिटर हॉस्पिटल जवळील दुर्गा कॅफेजवळ बंदुकीने गोळीबार केल्याने एक तरुण जखमी झाला असून गोळीबाराच्या घटनेनंतर आरोपीने स्वतःला गोळी मारून आत्महत्या केली.
baner near durga cafe gun firing youth injured accused killed himself pune police
baner near durga cafe gun firing youth injured accused killed himself pune policesakal

Baner News : बाणेर येथे जुपिटर हॉस्पिटल जवळील दुर्गा कॅफेजवळ बंदुकीने गोळीबार केल्याने एक तरुण जखमी झाला असून गोळीबाराच्या घटनेनंतर आरोपीने स्वतःला गोळी मारून आत्महत्या केली.

बाणेर येथे राहणारा आकाश जाधव या तरुणावर त्याच्या परिचित असलेल्या अनिल ढमाले याने सायंकाळी साडेसहाच्या दरम्यान आपण जवळच्या हॉटेल मध्ये कॉफी प्यायला जाऊ असं सांगून, स्वतः बरोबर कॉफी प्यायला घेऊन गेले.गाडीवरून उतरता क्षणीच लगेच ढमाले याने जाधव यांच्यावर बंदुकीने गोळीबार केला.

या हल्ल्यामध्ये जखमी झालेल्या आकाश जाधव याला जुपिटर हॉस्पिटल मध्ये उपचारासाठी दाखल करण्यात आले असुन ते अत्यावस्त आहेत. तर आरोपीने तिकडून पळ काढून औंध येथे स्वतःला गोळी मारून आत्महत्या केली. गोळीबाराच्या या घटनेमुळे परिसरात भीतीचे वातावरण निर्माण झाले असून चतुर्श्रुंगी पोलीस अधिक तपास करीत आहेत.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com