

Baner-Pashan Traffic
Sakal
पाषाण : बाणेर-पाषाण लिंक रस्त्यावर विरुद्ध दिशेने ये-जा करणाऱ्या दुचाकी आणि रिक्षाचालकांवर वाहतूक पोलिसांनी धडक कारवाई केली. मेट्रोच्या कामामुळे रस्ता अरुंद झाला असतानाही, अनेक वाहनचालक मोठा वळसा टाळण्यासाठी सर्रासपणे विरुद्ध दिशेने ये-जा करण्याचे प्रमाण वाढले होते. यामुळे येथील एका हॉटेलजवळील अरुंद झालेल्या रस्त्यावर अनेक अपघात आणि वादावादीच्या घटना घडत होत्या.