Balewadi Traffic : मोहननगर परिसराला वाहतूक कोंडीचा विळखा; महापालिका प्रशासनाचे दुर्लक्ष, तत्काळ उपाययोजना करण्याची मागणी
Pune Traffi : मोहननगर परिसरात आठवडी बाजार व खाऊगल्लीमुळे प्रचंड वाहतूक कोंडी होत आहे. रस्त्यांची दुरवस्था, बंद पथदिवे आणि बेशिस्त पार्किंगमुळे नागरिक हैराण झाले आहेत.
बालेवाडी : बाणेर येथील मोहननगर परिसरात आठवड्यातून तीनवेळा आठवडी बाजार भरतो. रस्त्याच्या एका बाजूला विक्रेत्यांच्या गाड्या, तंबू उभे केले जातात. तर रस्त्याच्या दुसऱ्या बाजूला दुकानांसमोर खाऊगल्लीची दुकाने सुरू असतात.