esakal | बाणेर, वाकड, हिंजवडीत घरखरेदीला पसंती! I Home
sakal

बोलून बातमी शोधा

Home

बाणेर, वाकड, हिंजवडीत घरखरेदीला पसंती!

sakal_logo
By
सकाळ वृत्तसेवा

पुणे - चांगल्या पायाभूत सुविधा, मुंबई-बंगळूर एक्स्‍पेस वे आणि वाढत असलेले आयटी क्षेत्र यामुळे पुण्यात घर घेणाऱ्या अनेकांची पसंती ही शहराच्या वायव्य दिशेला आहे. त्यामुळेच वाकड, महाळुंगे, ताथवडे, बाणेर, सूस, रावेत, किवळे, पुनावळे, हिंजवडी, बालेवाडी या भागात शहराच्या एकूण घर विक्रीच्या तुलनेत सर्वाधिक घर विक्री झाली आहे. त्यातून जानेवारी ते जुलै दरम्यान या भागात घरांचे विक्रीचे ७ हजार १६० कोटींचे व्यवहार झाले आहेत. क्रेडाई पुणे मेट्रोने सीआरई मॅट्रिक्स यांच्या वतीने तयार केलेल्या ‘पुणे हाउसिंग रिपोर्ट’द्वारे ही माहिती समोर आली आहे.

हिंजवडी आयटी पार्क, चांगले वातावरण यासह चांगल्या रहिवासास आवश्‍यक असलेल्या अनेक बाबी शहराच्या वायव्य दिशेला आहेत. त्यामुळे आत्ता व भविष्याचा विचार केला असता त्या भागात घरांना असलेली मागणी चांगली आहे. आम्ही पिंपरी-चिंचवडे शहराचे देखील अशाच प्रकारे विश्लेषण करणार आहोत. पिंपरीच्या पश्‍चिम भागात नागरिकांची चांगली पसंती आहे.

- अनिल फरांदे, अध्यक्ष, क्रेडाई पुणे मेट्रो

जानेवारी ते जुलै २०२१ मधील घरांची विक्री

वायव्य भाग

हिंजवडी, वाकड, महाळुंगे, ताथवडे, बाणेर, सूस, बालेवाडी, रावेत, किवळे, पुनावळे या वायव्य पुण्याच्या भागात ७ हजार १६० कोटी रुपये किमतीच्या घरांची विक्री झाली.

शहराचा विचार केल्यास एकूण विक्रीच्या २६ टक्के विक्री ही एकट्या याच भागात

त्याखालोखाल पिंपरी चिंचवड भागात २३.५ टक्के विक्री

नैर्ऋत्य भाग

धायरी, कोथरूड, आंबेगाव बुद्रुक, वारजे, हिंगणे, शिवणे, वडगाव या नैऋत्य पुण्याचा भाग वगळता पुण्याच्या सर्वच मायक्रो मार्केट्समध्ये घरांची विक्री वाढली आहे.

भागात चार हजार १३६ कोटी रुपयांच्या घरांची विक्री

२०२० मध्ये हा आकडा एक हजार ५९३ कोटी रुपये होता

ईशान्य भाग

वाघोली, मुंढवा, हडपसर, खराडी, धानोरी, लोहगाव या ईशान्य भागात पाच हजार १७४ कोटी रुपयांच्या घरांची विक्री

२०२० मध्ये हा आकडा दोन हजार १५१ कोटी रुपये होता.

२०१९ मध्ये ५ हजार ३०१ कोटी रुपये किमतींच्या घरांची विक्री झाली होती.

हेही वाचा: खासदार सुप्रिया सुळेचा केंद्र सरकारवर त्रिकास्त्र

आग्नेय भाग

उंड्री, कोंढवा, महम्मदवाडी, फुरसुंगी, कोंढवा बुद्रूक, येवलेवाडी या आग्नेय पुण्याच्या भागात ३ हजार ७३८ कोटी रुपयांच्या घरांची विक्री

२०२० मध्ये हा आकडा एक हजार ५५९ कोटी होता

२०१९ मध्ये ३ हजार ६९ कोटी रुपये किमतींच्या घरांची विक्री झाली होती.

मध्य पुणे

मध्य पुण्यात २०१९ मध्ये या भागात ७२३ कोटी रुपयांच्या घरांची विक्री झाली.

२०२० मध्ये हा आकडा ४७४ कोटी रुपये, तर २०२१ मध्ये ९०२ कोटी रुपये झाला आहे.

पिंपरी भागात २०१९ मध्ये पाच हजार २१८ कोटी रुपये, २०२० मध्ये दोन हजार ८६१ कोटी रुपये

२०२१ मध्ये सहा हजार ४४७ कोटी रुपये इतक्या किमतीच्या घरांची विक्री

loading image
go to top