खासदार सुप्रिया सुळेचा केंद्र सरकारवर त्रिकास्त्र । Supriya Sule | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

खासदार सुप्रिया सुळेचा केंद्र सरकारवर त्रिकास्त्र

खासदार सुप्रिया सुळेचा केंद्र सरकारवर त्रिकास्त्र

आंबेगाव बुद्रुक : शरद पवार यांना आलेल्या ईडी नोटिसला दोन वर्ष आज पूर्ण होत आहेत. त्यावेळी पवार साहेब म्हणाले होते, आज पर्यंतचा इतिहास आहे. दिल्लीच्या तख्ता पुढे हा महाराष्ट्र कधी झुकला नाही व कधीच झुकणार नाही.

त्यामुळे कितीही ईडीच्या नोटिसा पाठविल्या कितीही इनकम टॅक्सच्या नोटिसा पाठविल्या तरी आम्ही घाबरत नाही. आम्ही काहीच केलं नाही तर भीती कशाची? असे प्रतिपादन संसदरत्न खासदार सुप्रिया सुळे यांनी आंबेगावच्या दत्तनगर मधील चिल्ड्रन प्ले ग्राउंडच्या लोकार्पण कार्यक्रमात केले.

हेही वाचा: सोयगाव : रुद्रेश्वर धरणाला गळती, प्रशासन हादरले

प्रभाग क्रमांक ४० च्या नगरसेविका स्मिता कोंढरे यांच्या विकासनिधीतून तयार करण्यात आलेल्या दत्तनगर येथील सर्व्हे नं ४३ मधील, कै. अण्णासाहेब मारुती कोंढरे पाटील चिल्ड्रन प्ले ग्राउंडच्या लोकार्पण सोहळ्याचे आयोजन खासदार सुप्रिया सुळे यांच्या हस्ते करण्यात आले. यावेळी बोलताना सुळे म्हणाल्या, काही लोक महाराष्ट्रभर दर्शनाच्या कार्यक्रमास फिरत असतात. पण त्यांच्या हाती काही लागणार नाही. ह्या सरकारमध्ये आपला तो बाब्या आणि लोकाच ते कार्ट अशी गत आहे. त्यांच्यात गेला तर सौ खून माफ आणि विरोधात नुसतं बोललं तरी ईडीची नोटीस आहे. शिवाय काही लोकांना सत्ता पचवता आली नाही. असा विरोधकांना टोला खासदार सुळे यांनी लगावला.

हेही वाचा: बारामतीत महावितरणच्या वायरमनला मारहाण

आंबेगावचे प्रथम सरपंच तथा पोलीस पाटील व प्रथम पंचायत समिती सदस्य कै. अण्णासाहेब मारुती कोंढरे पाटील यांचे नाव या मैदानास देत असताना आणि लोकार्पण करत असताना मनस्वी आनंद होतो आहे. अण्णासाहेब यांचे काम हे समाजपोयोगी होते. प्रत्येक आंबेगावकरांच्या मनात त्यांचे मानाचे स्थान आहे. असे मनोगत स्थानिक नगरसेविका स्मिता कोंढरे यांनी यावेळी व्यक्त केले.

या लोकार्पण सोहळ्यास पुण्यनगरीच्या उपमहापौर सुनीता वाडेकर, विरोधी पक्षनेत्या दिपाली धुमाळ, माजी महापौर तथा राष्ट्रवादी काँग्रेस शहराध्यक्ष प्रशांत जगताप, नगरसेवक दत्तात्रय धनकवडे, युवराज बेलदरे, खडकवासला विधानसभा मतदारसंघाचे अध्यक्ष काकासाहेब चव्हाण नगरसेविका अमृता बाबर व जनहित विकास मंच संस्थापक अध्यक्ष सुधीर कोंढरे आदी उपस्थित होते.

loading image
go to top