
शिरूर : घुसखोरीच्या मार्गाने भारतीय सरहद्दीत प्रवेश करून बनावट आधारकार्ड व खोट्या ओळखपत्राच्या आधारे कारेगाव (ता. शिरूर) येथे गेल्या दोन वर्षांपासून अवैधरित्या वास्तव्यास असलेल्या चार बांगलादेशी घुसखोरांना आज अटक करण्यात आली. पुणे ग्रामीण च्या दहशतवादविरोधी पथकाने रांजणगाव एमआयडीसी पोलिसांच्या सहाय्याने ही धाडसी कारवाई केली. कारेगाव सारख्या गजबजलेल्या गावात चार घुसखोर राहात असल्याची घटना उघडकीस आल्यानंतर परिसरात खळबळ उडाली.