Bangladeshi Women : भारतात बेकायदा वास्तव्य करणाऱ्या दोन बांगलादेशी महिला पुण्यात अटक
Illegal Immigration : पुण्यात कात्रज परिसरात बेकायदा वास्तव्य करत असलेल्या दोन बांगलादेशी महिलांना आणि त्यांच्या साथीदाराला बनावट भारतीय ओळखपत्रांसह पोलिसांनी अटक केली.
पुणे : भारतात बेकायदा वास्तव्य करत दोन बांगलादेशी महिलांनी आधारकार्ड, पॅनकार्ड आणि भारतीय पारपत्र मिळविल्याचा प्रकार समोर आला आहे. आंबेगाव पोलिसांनी कात्रज परिसरातील या दोघींसह त्यांच्या साथीदारास अटक केली आहे.