
पुणे : सदनिका खरेदी करण्याचा बहाणा करुन बनावट कागदपत्रे बँकेत सादर करीत एका व्यक्तीने बँकेची तब्बल ४५ लाख रुपयांची फसवणूक केली. या प्रकरणी दत्तवाडी पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
पंकज रामदास पवार (रा.निगडी) असे गुन्हा दाखल करण्यात आलेल्या संशयीत आरोपीचे नाव आहे. या प्रकरणी सागर दत्तू उघाडे (वय ३६, रा. विश्रांतवाडी) यांनी फिर्याद दाखल केली आहे. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, पिंपळे सौदागर येथील एका व्यक्तीची सदनिका पंकजला खरेदी करायची होती. त्यासाठी त्याने कर्जासाठी लागणारी कागदपत्रे बनावट तयार करून ती बँकेकडे सादर केली.
त्यानंतर स्वारगेट येथील कॅनरा बँकेच्या शाखेत सदनिकेच्या मूळ मालकाऐवजी दुसऱ्याच व्यक्तीला बँकेच्या अधिकाऱ्यासमोर उभे केले. त्यानंतर बँकेने त्यास ४५ लाख रुपयांचे कर्ज मंजूर केले. ते पैसे त्याने घेतले. त्यापैकी काही रक्कम त्याने बँकेला कर्जाचा हफ्ता म्हणून परत केली. त्यानंतर मात्र त्याने कर्जाचे हप्ते भरले नाही. त्यामुळे बँकेने चौकशी केली, तेव्हा पंकजने फसवणूक केल्याचे निष्पन्न झाले. याप्रकरणी दत्तवाडी पोलिस अधिक तपास करत आहेत.
- पुण्याच्या बातम्या वाचण्यासाठी येथे क्लिक करा
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.