esakal | केंद्र सरकारच्या धोरणावर अजित पवारांचा सावध पवित्रा; सरसकट वाहतुकीबाबत वेगळा निर्णय घेणार?
sakal

बोलून बातमी शोधा

Ajit_Pawar

शिवाजीनगर येथील शासकीय अभियांत्रिकी महाविद्यालयाच्या आवारात उभारलेल्या जम्बो कोविड केअर सेंटरचे उद्घाटन मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या हस्ते झाले. कार्यक्रमानंतर पवार यांनी माध्यमांशी संवाद साधला.

केंद्र सरकारच्या धोरणावर अजित पवारांचा सावध पवित्रा; सरसकट वाहतुकीबाबत वेगळा निर्णय घेणार?

sakal_logo
By
सकाळ वृत्तसेवा

पुणे : आंतरराज्य आणि राज्यातर्गंत वाहतूक सुरू करण्याचा केंद्र सरकारचा आदेश महाराष्ट्रात अमलात आणण्याबाबत साशंकता व्यक्त करतानाच यासंदर्भात राज्य सरकार आपली भूमिका घेईल, असे राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी रविवारी (ता.२३) पुण्यात स्पष्ट केले. त्यावर मुख्यमंत्री आणि गृहमंत्र्यांशी चर्चा करून निर्णय घेतला जाईल, हेही त्यांनी आर्वजून सांगितले. त्यामुळे सरसकट वाहतुकीबाबत राज्य सरकार काय भूमिका घेणार? याची उत्सुकता आहे. 

मोठी बातमी : कोविडची लस ७३ दिवसांत येणार नाही; वाचा सीरम इन्स्टिट्यूटचा खुलासा

शिवाजीनगर येथील शासकीय अभियांत्रिकी महाविद्यालयाच्या आवारात उभारलेल्या जम्बो कोविड केअर सेंटरचे उद्घाटन मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या हस्ते झाले. कार्यक्रमानंतर पवार यांनी माध्यमांशी संवाद साधला. कोरोनाला रोखण्याचे उपाय, त्याचे परिणाम, सध्याची स्थिती आणि नव्या नियोजनाची माहिती पवार यांनी कार्यक्रमात दिली. राज्यातील कोरोना रुग्णांची स्थिती वाढत असतानाच आंतराराज्य आणि राज्यातर्गंत वाहतुकीत आडकाठी आणू नये, ती सुरू ठेवावी, असा आदेश केंद्र सरकारने सर्व राज्य सरकारांना दिला आहे. या पार्श्‍वभूमीवर पवार यांनी वाहतुकीच्या धोरणावर आपली भूमिका मांडली. 

सततच्या घरफोडी, जबरी चोरीच्या घटनांमुळे पुणेकर बेजार; व्यापाऱ्यांचही वाढलं टेन्शन!​

पवार म्हणाले, "कोरोनाचा संसर्ग आणि त्या-त्या राज्यांची भौगोलिक स्थिती लक्षात घेऊन निर्णय घेण्याची गरज आहे. त्यामुळे महाराष्ट्रातील व्यवस्थेबाबत लगेचच कोणताही निर्णय आणि त्याची अंमलबजावणी शक्‍य नाही. सर्व बाबींचा विचार आणि मुख्यमंत्र्यांशी चर्चा करून भूमिका ठरवली जाईल.'' 

अंडरवर्ल्ड डॉन दाऊद इब्राहीम हा कुठे आहे? हे काय करायचे आहे? अशी विचारणा करीत, त्यासाठी केंद्र सरकारची यंत्रणा सक्षम आहे, असे पवार यांनी स्पष्ट केले. 'कोण म्हणतं दाऊद इथे; कोण म्हणतं तो तिथे आहे,' असे सांगत हा विषय केंद्र सरकारचा असल्याकडे त्यांनी लक्ष वेधले. 

बबड्या सुधारलाय का? महाराष्ट्र पोलिसांच्या भन्नाट ट्विटने रंगली चर्चा​

राष्ट्रवादीचे नेते आणि आपले चिरंजीव पार्थ पवार यांच्याबाबत विचार केली असता, पालकमंत्री अजित पवार यांनी मात्र, माध्यमाच्या प्रतिनिधींच्या गराड्यातून वाट काढली. ज्या विषयावर बोलायचेच नाही, तो कशाला काढता? असा प्रतिप्रश्‍नही त्यांनी केला. अभिनेता सुशांतसिंग राजपूत मृत्यू प्रकरणावरून पार्थ हे चर्चेत आणि वादात आले आहेत. परंतु, त्यावर काही बोलण्यास पवार यांनी टाळले.

- पुण्याच्या बातम्या वाचण्यासाठी येथे क्लिक करा

(Edited by : Ashish N. Kadam)