e-pramaan
sakal
पुणे - दस्त नोंदणी आता ‘ई-प्रमाण’ या पोर्टलवर संरक्षित करण्याचा निर्णय नोंदणी व मुद्रांक शुल्क विभाग घेत असून, बँकांना केवळ दस्त क्रमांकाच्या आधारे त्याची सत्यता पडताळणी करता येणार आहे. त्यामुळे प्रत्यक्ष बँकेत न जाता ग्राहकांना दस्त क्रमांकाच्या आधारे कर्ज मिळू शकणार आहे. यासह ब्लॉकचेन तंत्रज्ञानाचा वापर करून, या दस्ताबाबत सर्व कार्यवाहीची नोंद होणार आहे.