Pune Crime : लोन अ‍ॅपवरील बदनामीमुळे २५ वर्षीय तरुणाची आत्महत्या | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

crime

Pune Crime : लोन अ‍ॅपवरील बदनामीमुळे २५ वर्षीय तरुणाची आत्महत्या

Pune Crime News : लोन अ‍ॅपवर होणाऱ्या सततच्या धमकी आणि बदनामीमुळे पुण्यातील २५ वर्षीय तरुणाची आत्महत्या केल्याचा धक्कादायक प्रकार समोर आला आहे. या घटनेमुळे एकच खळबळ उडाली असून, या प्रकरणी पीडित मुलाच्या वडिलांनी विमानतळ पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे.

हेही वाचा: Maharashtra Politics : ''दिल्ली जेवढं फडणवीसांचं ऐकते तेवढं शिंदेंचं ऐकणार का?''

सोहेल शेख (वय 25, विमाननगर) असे आत्महत्या केलेल्या तरूणाचे नाव असून, लोन अ‍ॅपवरुन कर्जाची परतफेड करण्यासाठी दिल्या जाणार्‍या धमकी व बदनामीला कंटाळून त्याने आत्महत्या केल्याचे सांगितले जात आहे.

हेही वाचा: Maharashtra Politics : ''पवार अन् राष्ट्रवादीच्या चर्चा एन्जॉय करा''

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, सोहेल याने काही महिन्यांपूर्वी वेगवेगळ्या लोन अ‍ॅपद्वारे कर्ज घेतले होते. एक कर्ज फेडण्यासाठी तो दुसरे लोन घ्यायचा. कर्जाची परतफेड करण्यासाठी वारंवार त्याला धमक्यांचे आणि शिवीगाळ करणारे फोन येत होते. इतकाच नाही तर, तुझी बदनामी केली जाईल असेदेखील सांगण्यात येत होते. या त्रासाला कंटाळून सोहेलने राहत्या घरी आत्महत्या केली. या प्रकरणाचा अधिक तपास पोलीस करत आहेत.

Web Title: Bank Loan Through Loan Aap Youth Suicide In Pune Due To Threat Defamation

Read Latest Marathi News Headlines of Maharashtra, Live Marathi News of Mumbai, Pune, Politics, Finance, Entertainment, Sports, Jobs, Lifestyle at Sakal. To Get Updates on Mobile, Download the Sakal Mobile App for Android & iOS.
सकाळ आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी टेलिग्राम, फेसबुक, ट्विटर, शेअर चॅट आणि इन्स्टाग्रामवर आम्हाला फॉलो करा तसेच, आमच्या YouTube Channel आजच Subscribe करा..