बँक ऑफ महाराष्ट्रला "टॉप इम्प्रुव्हर्स" मानांकनात प्रथम स्थान

सकाळ वृत्तसेवा
Friday, 11 September 2020

देशातील सार्वजनिक क्षेत्रातील बँकांमध्ये अग्रगण्य असलेल्या बॅंक ऑफ महाराष्ट्रला "टॉप इम्प्रुव्हर्स" या मानांकनामधे सार्वजनिक क्षेत्रातील सर्व बँकांमधे विजेता (प्रथम क्रमांक) घोषित करण्यात आले आहे.

पुणे - देशातील सार्वजनिक क्षेत्रातील बँकांमध्ये अग्रगण्य असलेल्या बॅंक ऑफ महाराष्ट्रला "टॉप इम्प्रुव्हर्स" या मानांकनामधे सार्वजनिक क्षेत्रातील सर्व बँकांमधे विजेता (प्रथम क्रमांक) घोषित करण्यात आले आहे.

ताज्या बातम्यांसाठी डाऊनलोड करा ई-सकाळचे ऍप

ईएएसई (EASE 2.0 संपर्काची सहजता आणि उत्कृष्ट सेवा) पारितोषिक विजेते या इंडियन बँक्स असोसिएशनने आयोजित केलेल्या दिमाखदार समारंभास अर्थमंत्री निर्मला सीतारामन, वित्त सेवा विभागाचे सचिव देबाशीष पांडा यांची उपस्थिती होती. 9 सप्टेंबर रोजी व्हिडिओ कॉन्फरन्सिंगद्वारे हा समारंभ झाला. हा सन्मान मिळणे विशिष्ट आहे आणि सर्व बँक कर्मचा-यांच्या सांघिक प्रयत्नांचे यात प्रतिबिंब आहे.

- पुण्याच्या बातम्या वाचण्यासाठी येथे ► क्लिक करा

"टॉप इम्प्रुव्हर्स अग्रगण्य स्पर्धक" या गटात बँक ऑफ महाराष्ट्रला द्वितीय क्रमांक मिळाला होता. ईएएसई 3.0 च्या 26 फेब्रुवारी रोजी झालेल्या समारंभात हा पुरस्कार मिळाला होता. याशिवाय कामगिरीच्या निकषावर 2018 या वर्षासाठी देखील बँक ऑफ महाराष्ट्रला ईएएसई पारितोषिक मिळाले होते.

Edited By - Prashant Patil


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Bank of Maharashtra ranks first in Top Improvements Rankings