

Massive Fire Breaks Out on Sixth Floor of Bank of India Building on Laxmi Road
Sakal
पुणे : लक्ष्मी रस्त्यावरील उंबऱ्या गणपती चौकातील (शगुन चौक) ‘बँक ऑफ इंडिया’च्या इमारतीतील सहाव्या मजल्यावर मंगळवारी (ता. २९) सकाळी अचानक भीषण आग लागली. या दुर्घटनेत महत्त्वाची कागदपत्रे, संगणक यंत्रणा जळून खाक झाली. दरम्यान, पहिल्या मजल्यावरील बॅंकेच्या कार्यालयास आगीची झळ पोचलेली नाही. सर्व रोकड सुरक्षित असून, बॅंकिंग व्यवहार नेहमीप्रमाणे सुरळीत सुरू असल्याचे बॅंकेच्या वरिष्ठ अधिकाऱ्याने स्पष्ट केले.