Baramati City Police have registered a fraud case against two accused in the government job scam.
sakal
बारामती : राज्यातील विविध शासकीय विभागांमध्ये नोकरी लावून देण्याचे आमिष दाखवत 117 युवकांची तब्बल पावणे चार कोटी रुपयांची फसवणूक केल्याप्रकरणी बारामती तालुका पोलिसांनी दोघांविरुद्ध गुन्हा दाखल केला आहे. या प्रकरणामुळे सरकारी नोकरीच्या नावाखाली सुरू असलेल्या मोठ्या फसवणूक रॅकेटचा पर्दाफाश झाला आहे.