
Accident News: बारामतीमध्ये रविवारी भीषण अपघात झाला. हायवाच्या मागच्या चाकाखाली येऊन दुचाकीवरील एक जण आणि त्यांच्या दोन मुलींचा मृत्यू झाला. त्यानंतर दुसऱ्या दिवशी मुलींच्या आजोबांनीही जीव सोडला. या दुर्दैवी घटनेने महाराष्ट्र हळहळला आहे. विशेष म्हणजे जेव्हा ओंकार आचार्य यांच्या पोटावरुन हायवाचे चाक गेले तेव्हा ते दोन्ही हातांवर जोर देऊन उठवण्याचा प्रयत्न करत होते. परंतु ते चाकाखाली अडकले होते. त्यांच्यासमोरच त्यांच्या दोन मुली पडलेल्या होत्या. एकीचं वय होतं ११ वर्षे आणि दुसरीचं वय होतं पाच वर्षे. दोघींना अशा अवस्थेत बघून ओंकार यांनी 'माझ्या मुलींना कुणीतरी वाचवा' अशी आर्त हाक दिली. दुर्दैवाने या अपघातामध्ये त्या तिघांचाही मृत्यू झाला.