esakal | प्लॅन परफेक्ट होता, पण पोलिसांचा तपास त्यापेक्षा भारी निघाला...
sakal

बोलून बातमी शोधा

crime

कोणत्याही सिनेमात शोभल असे हे कथानक बारामतीत घडले आणि कानून के हाथ लंबे होते है...याची प्रचिती खोटी फिर्याद दिलेल्या फिर्यादीला आली. 

प्लॅन परफेक्ट होता, पण पोलिसांचा तपास त्यापेक्षा भारी निघाला...

sakal_logo
By
मिलिंद संगई

बारामती (पुणे) : स्कॉर्पिओ गाडी चोरीला गेल्याची फिर्याद आल्यानंतर पोलिस तपासाला सुरवात करतात...अनेक दिशेने तपास करूनही पोलिसांना काही मागमूसच लागत नाही. त्यामुळे पोलिस वेगळ्याच पद्धतीने तपास सुरू करतात आणि तपास येऊन पोहचतो थेट फिर्यादीपर्यंतच...कोणत्याही सिनेमात शोभल असे हे कथानक बारामतीत घडले आणि कानून के हाथ लंबे होते है...याची प्रचिती खोटी फिर्याद दिलेल्या फिर्यादीला आली. 

भाजयुमो आक्रमक, जय श्रीराम असलेली दहा लाख पत्रे शरद पवारांना पाठवणार

बारामती तालुका पोलिस ठाण्यात 28 जून रोजी जमाल मोहमंद अब्दुल सय्यद (वय 40, रा. महादेव मळा, बारामती) हे फिर्याद देतात की, त्यांची पांढऱ्या रंगाची स्कॉर्पिओ चोरीला गेलेली आहे. दरवाजाचे लॉक तोडून गाडी चोरीची ही फिर्याद असते. त्यानुसार पोलिस निरिक्षक अण्णासाहेब घोलप यांच्या नेतृत्वाखाली सहायक पोलिस निरिक्षक योगेश लंगुटे व त्यांच्या पथकाने याचा तपास सुरु केला. गाडी चोरी झाल्यानंतरची सीसीटीव्ही फूटेज व रेकॉर्डवरील गुन्हेगारही तपासले जातात. अनेक प्रयत्न करूनही सुगावा लागत नाही. त्यामुळे पोलिसांनी मग आपल्या पध्दतीने याचा उलट्या दिशेने शोध सुरु केला. 

नापास विद्यार्थ्यांसाठी खूशखबर, पास होण्याची संधी आलीये चालून...

तांत्रिक बाबींच्या मदतीने माहिती घेतल्यानंतर घटना घडली, तेव्हा फिर्यादी त्या ठिकाणी गेलेलाच नव्हता, ही बाब समोर आली. त्यानंतर पोलिसांनी गोपनीय माहिती काढली असता विम्याचा लाभ मिळविण्यासाठी गाडी चोरीला गेली असल्याची खोटी तक्रार दिल्याचे स्पष्ट झाले. ही गाडी सलमान शेख (रा. कोष्टी गल्ली, बारामती) यांच्याकडे पार्किंगमध्ये लावल्याची माहिती मिळाली. पोलिसांनी सदर ठिकाणी जाऊन ही स्कॉर्पिओ हस्तगत केली. या प्रकरणातील फिर्यादी जमाल मोहमंद अब्दुल सय्यद यांनी विम्याचा लाभ मिळविण्यासाठी खोटी तक्रार दिल्याची कबुली दिली असल्याचे योगेश लगुंटे यांनी सांगितले.