बारामती : ग्रामीण भागातील बुद्धिमत्तेचा डंका ‘ऑक्सफर्ड’मध्ये

ॲग्रिकल्चरल डेव्हलपमेंट ट्रस्टच्या संशोधनावरील व्याख्यानाचे कौतुक
University of Oxford
University of OxfordSakal
Updated on

बारामती : ग्रामीण भागातील बुद्धिमत्तेचा डंका आता सातासमुद्रापार वाजू लागला आहे. गुणवत्ता असेल; तर आंतरराष्ट्रीय स्तरावरील विद्यापीठातूनही त्याला मान्यता मिळते, ही बाब बारामतीच्या ॲग्रिकल्चरल डेव्हलपमेंट ट्रस्टने सिद्ध केली आहे.

ऑक्सफर्ड विद्यापीठाच्या ‘Artificial Intelligence : Cloud and Edge Implementations’ या अभ्यासक्रमामध्ये ॲग्रिकल्चरल डेव्हलपमेंट ट्रस्टचे मुख्य कार्यकारी अधिकारी नीलेश नलावडे व युवा शास्त्रज्ञ सारंग नेरकर यांचे ‘मानवतावादी कृत्रिम बुद्धिमत्ता आणि हवामान, स्मार्ट शेतीमध्ये त्याचा वापर’ या विषयावर व्याख्यान झाले.

University of Oxford
बिटकॉईन प्रकरण: पोलिसांना मदत करणारे सायबर तज्ज्ञच निघाले आरोपी

ट्रस्टचे प्रमुख शरद पवार यांच्या दूरदृष्टीने ट्रस्टची वाटचाल सुरू आहे. तसेच, ट्रस्टचे विश्वस्त प्रतापराव पवार यांच्या पुढाकारातून ट्रस्ट व ऑक्सफर्डमधील नवीन सेतू बांधला गेला आहे. त्यानुसार नलावडे व नेरकर यांच्या व्याख्यानातून मांडलेली ग्रामीण भागातील गुणवत्ता ऑक्सफर्डच्या तज्ज्ञांनाही चकित करणारी होती, अशी प्रतिक्रिया आली आहे. त्यामुळे आता अनेक नवीन दालने भविष्यात खुली होतील, अशी शक्यता आहे. त्यामुळे आता आंतरराष्ट्रीय स्तरावर अनेक बाबींचे आदानप्रदान शक्य होणार आहे.

या व्याख्यानात नलावडे यांनी ॲग्रिकल्चरल डेव्हलपमेंट ट्रस्ट आणि त्याच्या विविध विभागांची, तरुण नवोदितांना आणि उद्योजकांना मदत करण्यासाठीच्या उपक्रमांची आणि ट्रस्टच्या माध्यमातून गेल्या अनेक वर्षात अनेक नवीन बाबींवर झालेल्या संशोधनाची माहिती ऑक्सफर्डच्या विद्यार्थ्यांना दिली. तर, नेरकर यांनी मानवतावादी कृत्रिम बुद्धिमत्तेवर केलेल्या संशोधनाची माहिती दिली. तसेच, शेतकऱ्यांसाठीच्या त्यांच्या नावीन्यपूर्ण तपशीलवार माहिती दिली. व्याख्यानात त्यांनी टोमॅटोमधील पिकणे, बटाट्यातील उशिरा होणारा अनिष्ट निदान, द्राक्षांमध्ये ब्रिक्स शोधणे यांचा थेट ऑनलाइन प्रात्यक्षिकही दिले. ऑक्सफर्डचे विद्यार्थ्यांनीही याची प्रशंसा केली. यासोबतच त्यांनी त्यांच्या अनोख्या कोलाबोरेटिव्ह युतीवर आधारित तैनाती मॉडेलची माहिती दिली. जिथे ते त्यांच्या नावीन्यपूर्णतेद्वारे आंतरराष्ट्रीय सहयोग, शैक्षणिक संस्था, सरकारी संस्था आणि शेतकरी उत्पादक संस्था एकत्र करत आहेत, हे मांडले.

University of Oxford
विरोधी पक्षनेत्‍यांना नोटीस पाठवून सरकारने स्वत:ची कबर खोदली : नितेश राणे

बारामतीच्या ॲग्रिकल्चरल डेव्हलपमेंट ट्रस्टच्या माध्यमातून गेल्या अनेक वर्षांपासून जे सातत्यपूर्ण संशोधन व विकास सुरु आहे, त्याची ऑक्सफर्डच्या विद्यार्थ्यांनी प्रशंसा केली. प्रात्यक्षिकांसह केलेले सादरीकरण विद्यार्थ्यांना आवडले. भविष्यात याच पद्धतीने आदानप्रदान सुरु राहील.

- पीटर हॉलंड, डीन, ऑक्सफर्ड युनिव्हर्सिटी

बारामतीच्या ॲग्रिकल्चरल डेव्हलपमेंट ट्रस्टच्या वतीने गेल्या काही वर्षात सुरु असलेले कृषी संशोधनाचे प्रयत्न प्रत्यक्ष पाहणे, हे ऑक्सफर्डच्या विद्यार्थ्यांसाठी नावीन्यपूर्ण व वेगळे होते. भविष्यात ॲग्रिकल्चरल डेव्हलपमेंट ट्रस्टसोबत विविध विषयांवर आदान प्रदान केले जाईल.

- डॉ. अजित जावकर, संचालक, आर्टिफिशियल इंटेलिजेन्स विभाग, ऑक्सफर्ड विद्यापीठ

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com