esakal | बारामती : अजितदादा म्हणतात शहाण्याने कोर्टाची पायरी चढू नये
sakal

बोलून बातमी शोधा

अजितदादा

अजितदादा म्हणतात शहाण्याने कोर्टाची पायरी चढू नये

sakal_logo
By
मिलिंद संगई ः सकाळ वृत्तसेवा

बारामती : तुम्हाला दोन्ही बाजूंचे वकील निकाल आपल्यासारखाच लागेल असे सांगतील पण तरीही मी तुम्हाला सांगतो की शहाण्या माणसाने कोर्टाची पायरी चढू नये....उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी आज बारामतीत हा सल्ला दिला. डिजिटल स्वाक्षरी असलेल्या सातबाराचे वाटप उपमुख्यमंत्री पवार यांच्या हस्ते आज (ता.2) बारामतीत करण्यात आले. त्यावेळी ते बोलत होते. ते म्हणाले , शेतकऱ्यांच्या घराघरांतील वादाचं मूळ हे जमीन आहे, त्यामुळे जमिनीवरून वाद करत बसू नका. तुम्हाला कोर्टात जाईपर्यंत सगळे गोड बोलतील. त्यानंतर मात्र तुम्हालाच त्रास होईल, त्यामुळं कोर्टाची पायरी चढू नका, असा सल्लाही अजित पवार यांनी या वेळी बोलताना शेतकरी कुटुंबांना दिला.

आजही जमिनीवरुन असलेल्या वादांची संख्या प्रचंड आहे, मी जेव्हा नागरिकांची निवेदन स्वीकारतो, त्यात दर आठवड्याला तहसीलदार, प्रांताधिकारी, अतिरिक्त जिल्हाधिकारी यांच्यासंदर्भातील काम मोठ्या प्रमाणात येतात. जमिनीची मोजणी, रस्ता यासंबंधीचे प्रश्न सोडवून द्या, अशी मागणी त्यातून केली जाते. अनेकदा शेतजमिनीतून वाद होत असतात.

हेही वाचा: ज्येष्ठ साहित्यिक द. मा. मिरासदार यांचं निधन

सद्यस्थितीत जमीन ही घराघरांतील वादाचे मूळ ठरत आहे. हे वाद कायमस्वरुपी मिटावेत, अशी आमची भूमिका आहे, त्यामुळंच विविध उपक्रम हाती घेतले जात असल्याचे सांगतानाच, बाबांनो कोर्टाची पायरी चढू नका, असा सल्ला राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी शेतकऱ्यांना दिला आहे. उपविभागीय अधिकारी दादासाहेब कांबळे, तहसिलदार विजय पाटील आदी उपस्थित होते.

loading image
go to top