Baramati News : प्राथमिक आरोग्य केंद्र आणि कर्मचारी निवासासाठी निधी मंजूर; सुप्रिया सुळे यांची माहिती baramati and daund fund sanction for Primary Health Center and Staff Accommodation supriya sule informed | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

mp Supriya Sule

Baramati News : प्राथमिक आरोग्य केंद्र आणि कर्मचारी निवासासाठी निधी मंजूर; सुप्रिया सुळे यांची माहिती

बारामती - राष्ट्रीय आरोग्य अभियानाअंतर्गत बारामती लोकसभा मतदार संघातील बारामती आणि दौंड तालुक्यांत प्राथमिक आरोग्य केंद्र तसेच कर्मचारी निवासस्थानांसाठी 12 कोटी 63 लाख रुपये मंजूर झाले आहेत. खासदार सुप्रिया सुळे यांनी ही माहिती दिली.

या निधीमधून बारामती तालुक्यातील डोर्लेवाडी येथे प्राथमिक आरोग्य केंद्र उभारण्यात येणार आहे. त्यासाठी 2 कोटी 76 लाख रुपये मंजूर झाले आहेत. तर सांगवी येथे प्राथमिक आरोग्य केंद्र कर्मचाऱ्यांसाठी निवासस्थान बांधण्यात येणार आहे. त्यासाठी 3 कोटी 65 लाख रुपये मंजूर झाले आहेत.

याबरोबरच दौंड तालुक्यातील रावणगाव येथे प्राथमिक आरोग्य केंद्राची मुख्य इमारत आणि कर्मचारी निवासस्थान बांधकाम करण्यात येणार आहे. त्यासाठी 6 कोटी 22 लाख रुपये मंजूर झाले आहेत. विधानसभेतील विरोधी पक्षनेते अजित पवार आणि खासदार सुप्रिया सुळे यांच्या प्रयत्नातून यासाठी जिल्हा परिषदेचे तत्कालीन उपाध्यक्ष रणजित शिवतरे यांचा जिल्हा परिषदेच्या माध्यमातून शासनाकडे पाठपुरावा सुरू होता.