

Baramati by poll preparation draft voter list released by administration
Esakal
अजित पवार यांच्या निधनानंतर रिक्त झालेल्या बारामतीत विधानसभा मतदारसंघातील जागेवर लवकरच पोटनिवडणूक होण्याची शक्यता आहे. या पोटनिवडणुकीच्या पार्श्वभूमीवर प्रशासन आता तयारीला लागल्याचं दिसून येतंय. संभाव्य पोटनिवडणुकीच्या पार्श्वभूमीवर प्रारूप मतदारयादी सोमवारी प्रसिद्ध करण्यात आलीय. आता मतदारांना या यादीवर २५ फेब्रुवारीपर्यंत दावे आणि हरकती नोंदवता येणार आहेत. याबाबतची माहिती जिल्हाधिकारी जितेंद्र डुडी यांनी दिलीय.