
बारामती : शहर व परिसरात नवमतदार व वयोवृध्दांनीही मतदानाचा तितक्याच उत्साहाने हक्क बजावला. अनेक मतदार सकाळपासूनच मतदानासाठी घराबाहेर पडलेले दिसत होते. अनेक महिला एखाद्या कार्यक्रमाला उपस्थित राहण्यासाठी जाताना ज्या पध्दतीने तयार होऊन जातात, त्याच पध्दतीने मतदानासाठी मोठया उत्साहाने जाताना पाहायला मिळाल्या.