बारामती बँकेकडून मुख्यमंत्री सहायता निधीला 11 लाखांचा धनादेश

सकाळ वृत्तसेवा
Saturday, 23 May 2020

- मुख्यमंत्री सहायता निधीसाठी आज तब्बल 11 लाख रुपयांचा धनादेश आज देण्यात आला.

बारामती : बारामती सहकारी बँकेच्या वतीने कोरोनाच्या संकटावर मात करण्यासाठी मुख्यमंत्री सहायता निधीसाठी आज तब्बल 11 लाख रुपयांचा धनादेश आज देण्यात आला.

ताज्या बातम्यांसाठी डाऊनलोड करा ई-सकाळचे ऍप

बँकेचे अध्यक्ष श्रीकांत सिकची यांच्यासह उपाध्यक्ष अविनाश लगड, संचालक सचिन सातव, उध्दव गावडे आदींनी उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्याकडे हा धनादेश सुपूर्द केला.

पुण्याच्या बातम्या वाचण्यासाठी येथे ► क्लिक करा

कोरोनाग्रस्तांच्या मदतीसाठी मुख्यमंत्री सहायता निधीला सढळ हस्ते मदत करा, असे आवाहन अजित पवार यांनी केले होते. त्यानुसार बारामती सहकारी बँकेने 11 लाख रुपयांचा धनादेश आज पवार यांच्याकडे सुपूर्द केला. 


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Baramati Bank gives 11 Lakhs Cheque to Chief Ministers Relief Fund in Baramati Pune