Pune : बारामती बाजार समितीत कापुस खरेदी विक्रीस प्रारंभ

प्रशासक मिलिंद टांकसाळे यांच्या हस्ते प्रारंभ झाला
Baramati Bazaar starts buying selling cotton
Baramati Bazaar starts buying selling cotton sakal
Summary

प्रशासक मिलिंद टांकसाळे यांच्या हस्ते प्रारंभ झाला

बारामती : बारामती येथील कृषि उत्पन्न बाजार समितीत आज उघड लिलाव पद्धतीने कापुस खरेदी विक्रीचा प्रारंभ झाला. बारामती मर्चन्ट असोसिएशनचे माजी अध्यक्ष जवाहर वाघोलीकर व बारामती सहकारी बँकेचे अध्यक्ष सचिन सातव, प्रशासक मिलिंद टांकसाळे यांच्या हस्ते प्रारंभ झाला.

बारामती बाजार समितीची ओळख यापुर्वीची कॉटन मार्केट म्हणुन होती, येथे दिड लाख क्विंटल आवक होत होती. आता पुन्हा 35 वर्षानंतर परत कापसाचे लिलाव होत असल्याने याचा आनंद होत आहे, अशी भावना जवाहर वाघोलीकर यांनी व्यक्त केली.

भविष्यात बारामती बाजार आवारात कापसाची मोठी आवक होईल व कॉटन मार्केट म्हणुन बारामती बाजारपेठ विकसित होईल. पुर्वी प्रमाणे तालुक्यातील इतर संस्थांनी जिनिंग उभारून सहभाग घ्यावा. त्यामुळे कापसाला चागले दिवस येतील, अशी अपेक्षा त्यांनी व्यक्त केली.

पहिल्या दिवशी कापसाची तीस क्विंटलची आवक होऊन 8901 रुपये प्रति क्विंटल उच्चांकी दर मिळाल. सरासरी 7500 रुपये प्रति क्विंटल दर निघाला. कल्पेश सोनवणे यांच्या दुकानावर राजेंद्र जानु मदने (शिरवली, ता. बारामती) या शेतक-यास 8901 रुपये हा उच्चांकी दर मिळाला. यावेळी बाळासाहेब फराटे, शिवाजी फाळके, उमेश सोनवणे, केशवराव मचाले यांच्या दुकानावर कापसाची आवक झाली. खरेदीदार म्हणुन अमोल वाडीकर, संभाजी किर्वे, निलेश भिंगे, बाळासो फराटे यांनी सहभाग घेतला.

कापसाचे लिलाव दर बुधवार व शनिवार या दिवशी होतील. आज बारामती व फलटण या तालुक्यातुन कापसाची आवक झाली अशी माहिती बाजार समितीचे सचिव अरविंद जगताप यांनी दिली. यावेळी बाजार समितीचे माजी सदस्य रमेश गोफणे, अनिल खलाटे, सुनिल पवार, दत्तात्रय सणस, राजेंद्र बोरकर, ज्ञानदेव कदम, सुर्यकांत गादिया, शरद भिंगे, व्यापारी असोसिएशनचे अध्यक्ष अमोल वाडीकर, मिलिंद सालपे उपस्थित होते.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com