
बारामतीत धावत्या बसमध्ये एका व्यक्तीनं दुसऱ्या प्रवाशावर हल्ला केला होता. त्यावेळी मागच्या सीटवर बसलेल्या महिलेला मोठा धक्का बसलेला. या धक्क्यानंतर महिला बेशुद्ध पडली होती. तिच्यावर रुग्णालयात उपचार सुरू होते. पण आता महिलेचा मृत्यू झाला आहे. वर्षा रामचंद्र भोसले असं मृत्य झालेल्या महिलेचं नाव आहे. महिलेवर पाच दिवसांपासून रुग्णालयात उपचार सुरू होते.