esakal | महेश रोकडे बारामतीचे नवीन मुख्याधिकारी
sakal

बोलून बातमी शोधा

baramati

महेश रोकडे बारामतीचे नवीन मुख्याधिकारी

sakal_logo
By
सकाळ वृत्तसेवा

बारामती : प्रदीर्घ प्रतिक्षेनंतर अखेर आज बारामती नगरपालिकेमध्ये महेश रोकडे हे नूतन मुख्याधिकारी म्हणून रुजू झाले. किरणराज यादव यांची पदोन्नतीवर मुंबईला बदली झाल्यानंतर जवळपास 80 दिवस बारामती नगरपालिकेला मुख्याधिकारीच मिळत नव्हते. बारामती नगरपालिका अ वर्ग नगरपालिका असून राज्यात या नगरपालिकेचा विकासकामांच्या बाबत वेगळा नावलौकीक आहे. असे असले तरी नगरपालिकेमध्ये मुख्याधिकारी टिकत नाही असा काहीसा संदेश अधिका-यांमध्ये गेल्याची चर्चा होती.

उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या नेतृत्वाखाली बारामती नगरपालिकेच्या अखत्यारीत कोट्यवधींची विकासकामे सुरु असून ती वेगाने पूर्ण करण्यासह नागरिक व नगरसेवक यांच्यात समन्वय राखून विकासकामांना गती देण्याचे आव्हान रोकडे यांच्यापुढे असेल.

हेही वाचा: साकीनाका बलात्कार प्रकरणी पुरावे मिळाले - मुंबई पोलिस

बारामतीला विविध विकासकामांसाठी मिळणा-या निधीचा योग्य विनियोग करण्यासह ही विकासकामे दर्जेदार कशी होतील हेही त्यांना पाहावे लागणार आहे. नगरपालिका प्रशासनाकडून लोकांना मोठ्या अपेक्षा आहेत, त्या मुळे त्या अपेक्षांनाही त्यांना तोंड द्यावे लागेल.

दरम्यान महेश रोकडे यांनी या पूर्वी विभागीय आयुक्त कार्यालयात सहायक आयुक्त म्हणून तर नांदेड, इंदापूर, विटा, शिरुर येथे बारा वर्षे मुख्याधिकारी म्हणून काम केलेले आहे. प्रदीर्घ अनुभव असलेले कार्यक्षम अधिकारी म्हणून त्यांचा नावलौकीक आहे.

loading image
go to top