Baramati: बालदिनानिमित्त वसुंधरा वाहिनीवर चिमुकल्यांचा ताबा | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

बालदिनानिमित्त वसुंधरा वाहिनीवर चिमुकल्यांचा ताबा

बालदिनानिमित्त वसुंधरा वाहिनीवर चिमुकल्यांचा ताबा

sakal_logo
By
मिलिंद संगई, बारामती.

बारामती : येथील विद्या प्रतिष्ठान संचलित वसुंधरा वाहिनीवरून बाल दिनानिमित्त मुलांनी मुलांसाठी खास प्रसारण सेवा सादर केली. या दिवशी नेहमी मस्ती की पाठशाला या कार्यक्रमात सहभागी असणाऱ्या मुलांना संधी देण्यात आली.

अवंतिका वाबळे या बाल निवेदिकेने फोन इन कार्यक्रमाच्या माध्यमातून छोट्या बाल दोस्तांशी संवाद साधला. संगीत मैफिल या कार्यक्रमात समर्थ वणवे, अन्वेशा बोके, साई गदादे, त्रिशा घोळवे, पार्थ कुलकर्णी, अमित बडवे, शर्वरी वणवे हे विद्यार्थी सहभागी झाले होते. या कार्यक्रमाचे सूत्रसंचालन डॉ. स्वाती आनंद यांनी केले, तर अभिजीत पालकर यांनी मार्गदर्शन केले. चैतन्य मुळीक या विद्या प्रतिष्ठानच्या विद्यार्थ्याने सिंथेसायझर वर गाणी प्रसारित केली.

हेही वाचा: पुणे : मंत्र्यांच्या आदेशाने शैक्षणिक कार्यशाळा

मुलांबद्दल वाटणाऱ्या प्रेम व जिव्हाळ्याविषयी आदर व्यक्त करणाऱ्या कार्यक्रमांची निर्मिती व्हावी अशी अपेक्षा विद्या प्रतिष्ठानच्या विश्वस्त सुनेत्रा पवार यांनी व्यक्त केली. संस्थेच्या उपाध्यक्ष अँड. ए.व्ही. प्रभुणे, सचिव अँड. नीलीमा गुजर, खजिनदार युगेंद्र पवार, विश्वस्त डॉ. राजीव शहा, किरण गुजर, मंदार सिकची तसेच व्ही.आय.आय.टी.चे संचालक डॉ. आनंद देशमुख यांनी मार्गदर्शन केले. केंद्रप्रमुख आशा मोरे यांच्या नेतृत्वाखाली ऋतुजा आगम व स्नेहल कदम यांनी सादरीकरण केले.

loading image
go to top