Pune: मंत्र्यांच्या आदेशाने शैक्षणिक कार्यशाळा | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

Uday Samant

पुणे : मंत्र्यांच्या आदेशाने शैक्षणिक कार्यशाळा

पुणे : राज्याचे उच्च व तंत्रशिक्षण मंत्री उदय सामंत यांनी ‘उच्च व तंत्रशिक्षण मंत्रालय@’ या कार्यक्रमाची घोषणा करण्यात आली आहे. त्या अंतर्गत विद्यार्थी, पालक, प्राध्यापक आणि शैक्षणिक संस्थांच्या समन्वयासाठी जिल्हास्तरीय शैक्षणिक कार्यशाळांचे आयोजन करण्यात येणार आहे. यासंबंधी उच्चशिक्षण सहसंचालक यांनी परिपत्रक काढून पुणे, नाशिक आणि नगर जिल्ह्यातील संबंधितांना बैठकीचे निर्देश दिले आहे.

जिल्हा स्तरावर प्रत्येक दोन महिन्यातून एकदा अशी कार्यशाळा आयोजित करण्यात येणार आहे. शिक्षक, पालक किंवा विद्यार्थ्यांच्या अडीअडचणींवर चर्चा करून, समस्यांच्या निराकरणासाठी यात मार्ग काढण्यात येणार आहे. लॉकडाउनच्या दीर्घ कालावधीनंतर महाविद्यालये सुरू होत असून, शैक्षणिक क्षेत्रातील अनेक अडचणींमध्ये या काळात वाढ झाली आहे. विद्यार्थ्यांना अभ्यासक्रमापासून ते परीक्षांपर्यंत अनेक अडचणींचा सामना करावा लागत आहे. वाढलेल्या समस्यांची तीव्रता लक्षात घेता अशा जिल्हास्तरीय शैक्षणिक कार्यशाळांचे राज्यभरात नियोजन करण्यात आले आहे.

हेही वाचा: हडपसर : साडेसतरानळी येथील आगीत एकाचा होरपळून मृत्यू

पुणे विभागातील कार्यशाळा

जिल्हा ः ठिकाण ः दिनांक व वेळ

पुणे ः मॉडर्न कला, वाणिज्य व विज्ञान महाविद्यालय, शिवाजीनगर ः १७ नोव्हेंबर, सकाळी साडेदहा

नगर ः न्यू आर्ट कॉमर्स ॲन्ड सायन्स कॉलेज ः २३ नोव्हेंबर, सकाळी साडेदहा

नाशिक ः के.टी.एच.एम.महाविद्यालय ः २६ नोव्हेंबर, सकाळी साडेदहा

loading image
go to top