बारामती - संत तुकाराम महाराज पालखी सोहळा शुक्रवारी (ता. 27) सकाळी बारामतीहून सणसरच्या दिशेने मार्गस्थ झाला. पालखी सोहळा बारामतीतून बाहेर पडताच बारामती नगरपालिकेच्या आरोग्य विभागाने लगोलग शहराची स्वच्छता मोहिम सुरु केली.
काही तासात बारामती शहर आरोग्य विभागाने चकाचक केले. जवळपास तीनशे स्वच्छतादूतांनी विद्यार्थ्यांच्या मदतीने स्वच्छता मोहिम राबविली.