बारामती सहकारी बँकेच्या निवडणूकीचे बिगुल वाजले | Baramati | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

बारामती सहकारी बँकेच्या निवडणूकीचे बिगुल वाजले

बारामती सहकारी बँकेच्या निवडणूकीचे बिगुल वाजले

sakal_logo
By
सकाळ वृत्तसेवा

बारामती : शहर व तालुक्याच्या अर्थकारणात मोलाची भूमिका असलेल्या बारामती सहकारी बँकेची पंचवार्षिक निवडणूक प्रक्रीया 22 नोव्हेंबर पासून सुरु होणार आहे. व्यापारी, छोटे व्यावसायिक, शेतकरी व इतरांना अर्थसहाय्य करणारी बँक म्हणून नावलौकीक असलेल्या बँकेवर संचालक पदासाठी अनेक सभासद इच्छुक आहेत. या बँकेवर राष्ट्रवादीचे निर्विवाद वर्चस्व असल्याने उपमुख्यमंत्री अजित पवार हेच राष्ट्रवादीच्या विचारांच्या 15 संचालकांची नावे निश्चित करणार हे स्पष्ट आहे. यंदा राष्ट्रवादीच्या विरोधात पॅनेल केले जाणार की समन्वयाने निवडणूक बिनविरोध होणार याची उत्सुकता आहे.

बारामती सहकारी बँकेची स्थापना 1961 मध्ये झाली होती. त्या नंतरच्या काळात अनेक मान्यवरांनी या बँकेच्या प्रगतीसाठी मोलाचे योगदान दिले. आज अजित पवार यांच्या नेतृत्वाखाली बँकेचे कामकाज चालते. उत्तम कामगिरी करणारी सहकारी क्षेत्रातील बँक म्हणून बँकेने नावलौकीक प्राप्त केला आहे.

हेही वाचा: अमरावती: बाळासाहेब ठाकरे असते तर थोबाडीत लगावली असती- चंद्रकांत पाटील

गेल्या काही वर्षात बँकेने आपले कार्यक्षेत्र विस्तारले. आजमितीस बँकेच्या सहा जिल्ह्यात तब्बल 36 शाखा आहेत. बँकेने आधुनिकीकरणाची कास धरल्याने बँकेची प्रगतीही वेगाने सुरु आहे. अनेक व्यावसायिकांसह लघुउद्योजकांनाही बँकेने अर्थसहाय्य करुन त्यांच्या व्यवसायाच्या उभारणीत मदत केली आहे.

निवडणूक कार्यक्रम असा असेल....

• 15 ते 22 नोव्हेंबर उमेदवारी अर्ज दाखल करण्याचा कालावाधी

• 23 नोव्हेंबर रोजी अर्जांची छाननी

• 24 नोव्हेंबर रोजी उमेदवारी अर्जाची यादी प्रसिध्दी

• 8 डिसेंबर उमेदवारी अर्ज माघारी घेण्याची अंतिम तारिख

• 9 डिसेंबर चिन्ह वाटप

• 19 डिसेंबर रोजी मतदान

• 21 डिसेंबर रोजी मतमोजणी.

बारामती सहकारी बँक दृष्टीक्षेपात....

• सहा जिल्ह्यात तब्बल 36 शाखा

• 2260 कोटी रुपयांच्या ठेवी

• 1525 कोटी रुपयांचे कर्ज वाटप

• 16456 सभासद संख्या

• 38 कोटी रुपयांचे भाग भांडवल

नॉनशेड्यूल्ड क्षेत्रातील पुणे विभागातील सर्वात मोठी बँक मिलिंद संगई, बारामती

loading image
go to top