अमरावती: बाळासाहेब ठाकरे असते तर थोबाडीत लगावली असती- चंद्रकांत पाटील | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

Chandrakant Patil

अमरावती: बाळासाहेब ठाकरे असते तर थोबाडीत लगावली असती- चंद्रकांत पाटील

नाशिक: त्रिपुरा येथील हिंसात्मक घटनेचा निषेध व्यक्त करण्यासाठी काल शुक्रवारी अमरावतीमध्ये मुस्लिम समाजाकडून मोर्चा काढण्यात आला होता. या घटनाक्रमाला हिंसक वळण लागल्याचं पहायला मिळालं होतं. त्याच्या निषेधार्थ आज भाजपने शहर बंदचं आवाहन केलं होतं. या बंदला आता हिसंक वळण लागल्याचं चित्र आहे. गाड्यांची तसेच दुकानांची तोडफोड करण्यात येत आहे. यावर भाजपचे प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांनी प्रतिक्रिया दिली आहे. त्यांनी म्हटलंय की, मला खूप कीव येते आणि वाईट वाटतं की राजकारणासाठी आपण किती लाचार झालो आहेत. बाळासाहेब ठाकरे आज असते तर त्यांनी थोबाडीत लगावलं असतं. काय चाललंय काय हे? राज्य करा, मुस्लिमांची मते मिळवा, 95 टक्के मुसलमान हा देशप्रेमी आहे. मात्र, 5 टक्के जो गडबड करतो, त्याचा निषेध करा ना! मुस्लिमांच्या मतांसाठी हे सगळं करताय? असा सवाल त्यांनी केला आहे.

हेही वाचा: अमरावती: दंगली घडवून सरकार अस्थिर करण्याचं हे षड्यंत्र: संजय राऊत

ते म्हणाले की, पाच टक्के मुसलमान त्यांच्या धार्मिक नेत्यांच्या चिथावणीला बळी पडून हिंसक होतात, त्यावर सुद्धा तुम्ही टीका करत नाही? त्रिपुराचं कारण सांगून इथे अमरावती, मालेगावमध्ये अस्थिरता निर्माण करणं योग्य आहे का? काल अनेक ऑफिसेस आणि दुकाने फोडण्यात आली, त्यावर टीका करा, मुस्लिम मतांची काळजी करु नका, असा खोचक टोला त्यांनी महाविकास आघाडीला लगावला आहे.

हेही वाचा: अमरावती वगळता सर्व ठिकाणी परिस्थिती नियंत्रणात - गृहमंत्री

रझा अकादमी भाजपचं पिल्लू आहे यावर म्हणाले की, सगळ्या गोष्टी आमच्याच आहेत का? काय सुरु आहे ही चेष्टा? प्रत्येक ठिकाणी भाजपचाच हात असतो का? एवढ्या एसटी कर्मचाऱ्यांच्या आत्महत्त्या झाल्या तरी भाजपचाच हात? तीन पक्ष एकत्र असून तुम्ही दुबळे आहात. सरकार अपयशी आहेत. माजी गृहमंत्री तुरुंगात आहेत, आजी गृहमंत्री आता आजारातून उठलेत तर मुख्यमंत्री दवाखान्यात आहेत. सध्या राज्य बाहेरुन चालवलं जातंय. त्रिपुरात घडलेल्या घटनेचा निषेध अमरावतीत करायला हरकत नाही. मात्र, शांततेत करा, ते घडत नसेल तर त्याचा निषेध करायला नको का? असा प्रश्न त्यांनी विचारलाय.

loading image
go to top