न्यायव्यवस्था आली धावून, अपघातग्रस्त दांपत्याला मिळाला आधार 

मिलिंद संगई
Tuesday, 23 June 2020

लॉकडाउनच्या काळातही ज्यांना गरज आहे, अशा व्यक्तींच्या मदतीला न्यायव्यवस्था कशी धावून येते, याची प्रचिती बारामतीत आली. 

बारामती (पुणे) : लॉकडाउनच्या काळातही ज्यांना गरज आहे, अशा व्यक्तींच्या मदतीला न्यायव्यवस्था कशी धावून येते, याची प्रचिती बारामतीत आली. 

बारामतीतील शिवाजी लोणकर व शलाका लोणकर यांचा मोटारसायकलवरुन जाताना अपघात झाला. अपघात मोठा असल्याने त्यात लोणकर दांपत्याचे नुकसान झाले. यात अपंगत्वाला सामोरे जावे लागल्याने कौटुंबिक चरितार्थाचाही प्रश्न याने निर्माण झाला. या अपघातानंतर नुकसानभरपाईसाठी मोटार अपघात न्यायाधिकरणात प्रकरण दाखल केले होते. या प्रकरणी कंपनीनेही माणुसकीची भूमिका राखत यात नुकसानभरपाई देण्याचे कबूल केले. 

तीस दिवसांच्या बाळाची झुंज यशस्वी; ससूनमध्ये उपचार

बारामती येथील न्यायाधीश डी. बी. बांगडे यांच्या समोर हे प्रकरण आले होते. फ्यूचर जनरल इंडिया इन्शुरन्स कंपनीने या प्रकरणी तडजोड करुन पावणेसात लाख रुपये नुकसानभरपाई देण्याचे मान्य केले. अँड. विशाल बर्गे यांनी या प्रकरणी विशेष प्रयत्न केले. अडचणीच्या काळात या दांपत्याला ही मदत मोलाची होती. 

पुण्याच्या बातम्या वाचण्यासाठी येथे  क्लिक करा

दीपक शिरवलकर, सुनीलकुमार सिंग, राखी आनंद, उमाकांत शिरसट, जिमीत बुवा, संतोष मोरे यांच्या एकत्रित प्रयत्नाने या दांपत्याला योग्य नुकसानभरपाई मिळाली, असे अँड. बर्गे यांनी सांगितले. 


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: baramati- Compensation to the injured couple through the court