esakal | CoronaVirus : बारामतीतील बांधकामेही 31 मार्चपर्यंत बंद राहणार

बोलून बातमी शोधा

Construction Workill be Closed till 31 march.jpg

राज्यच नव्हे तर देश व जगातही कोरोनाच्या मुळे संकटाची चाहूल लागली आहे, शासन सर्वतोपरी उपाययोजना करीत असून आम्हीही शासनाच्या प्रयत्नांना पाठिंबा देण्याच्या उद्देशाने हा निर्णय घेतल्याचे या संदर्भात प्रसिध्दीस दिलेल्या पत्रकात नमूद करण्यात आले आहे.

CoronaVirus : बारामतीतील बांधकामेही 31 मार्चपर्यंत बंद राहणार
sakal_logo
By
मिलिंद संगई

बारामती : कोरोनाच्या संकटाच्या पार्श्वभूमीवर क्रेडाई बारामतीच्यावतीने 31 मार्चपर्यंत सर्व प्रकारची बांधकामे बंद ठेवण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. क्रेडाई बारामतीचे अध्यक्ष सुरेंद्र भोईटे, सचिव राहुल खाटमोडे व खजिनदार भगवान चौधर यांनी ही माहिती दिली. 

ऐकण्यासाठी डाऊनलोड करा ई-सकाळचे ऍप

राज्यच नव्हे तर देश व जगातही कोरोनाच्या मुळे संकटाची चाहूल लागली आहे, शासन सर्वतोपरी उपाययोजना करीत असून आम्हीही शासनाच्या प्रयत्नांना पाठिंबा देण्याच्या उद्देशाने हा निर्णय घेतल्याचे या संदर्भात प्रसिध्दीस दिलेल्या पत्रकात नमूद करण्यात आले आहे.

Coronavirus : अतिउत्साहींचा अतिरेक; हेतूलाच हरताळ

बांधकामाच्या निमित्ताने अधिक लोक एकत्र येऊन या विषाणूचा संसर्ग होऊ नये या उद्देशाने हे पाऊल उचलण्यात आल्याचे नमूद केले आहे.