esakal | बारामतीत कोरोनाग्रस्तांच्या रुग्णांनी गाठला पावणेसातशेंचा टप्पा
sakal

बोलून बातमी शोधा

Corona-patient

बारामती शहरातील कोरोनारुग्णांच्या संख्येने आज उच्चांक गाठला. काल घेतलेल्या नमुन्यांपैकी तब्बल 43 रुग्ण पॉझिटीव्ह आल्याने आज लोकांचे धाबे दणाणले. काल आणि आज दोन दिवसात तब्बल 61 जण कोरोनाग्रस्त असल्याचे निष्पन्न झाल्याने प्रशासनाचीही काळजी आता वाढली आहे.

बारामतीत कोरोनाग्रस्तांच्या रुग्णांनी गाठला पावणेसातशेंचा टप्पा

sakal_logo
By
मिलिंद संगई

बारामती - शहरातील कोरोनारुग्णांच्या संख्येने आज उच्चांक गाठला. काल घेतलेल्या नमुन्यांपैकी तब्बल 43 रुग्ण पॉझिटीव्ह आल्याने आज लोकांचे धाबे दणाणले. काल आणि आज दोन दिवसात तब्बल 61 जण कोरोनाग्रस्त असल्याचे निष्पन्न झाल्याने प्रशासनाचीही काळजी आता वाढली आहे.

ताज्या बातम्यांसाठी डाऊनलोड करा ई-सकाळचे ऍप

- पुण्याच्या बातम्या वाचण्यासाठी येथे ► क्लिक करा

बारामतीच्य कोरोनाग्रस्तांचा आकडा तब्बल पावणेसातशेच्या घरात गेल्याने आता हजाराच्या दिशेने या आकड्याची वेगाने वाटचाल सुरु झाली आहे. 

बारामतीत कोरोनाचा समूह संसर्ग झाला असे समजूनच आता उपाययोजना करण्याची गरज पुन्हाएकदा निर्माण झाली आहे. समाजाच्या विविध घटकात वेगाने कोरोनाचा फैलाव होत असल्याने आणि कुटुंबतील सर्वच जण पॉझिटीव्ह येऊ लागल्याने वेगळ्या उपाययोजनांची गरज निर्माण झाली आहे. 

ताज्या बातम्यांसाठी डाऊनलोड करा ई-सकाळचे ऍप

- पुण्याच्या बातम्या वाचण्यासाठी येथे ► क्लिक करा

एकीकडे सर्वच निर्बंध शिथील झालेले असताना हा उद्रेक थोपविताना नेमके काय केले पाहिजे हे प्रशासनालाही समजेनासे झाल्याचे चित्र आहे. वैयक्तिक काळजीसोबतच गर्दी टाळण्यासह परस्परांचा संपर्कही कमी करण्याची गरज बोलून दाखवली जात आहे. लक्षणे नसलेल्या रुग्णांचे प्रमाण अधिक असले तरी नियमित होणारे मृत्यू हीही बारामतीसाठी चिंतेची बाब आहे. 

हातात पैसा नाही, खायचं काय?; डीएसकेंच्या गुंतवणूकदारांचा प्रश्‍न

काल बारामतीत एकूण 134 नमुने आरटीपीसीआर तपासणीसाठी घेण्यात आले होते त्यापैकी 89 जणांचा अहवाल निगेटिव्ह आला असून बारामती शहरातील 15 व तालुक्यातील 14 असे 29 जणांचा अहवाल पॉझिटिव्ह आला आहे. 

कोरोना चाचण्यांमध्ये पुणे देशात अव्वल स्थानावर

खाजगी प्रयोगशाळेच्या रात्री उशीरा आलेल्या अहवालात शहरातील 12 व ग्रामीण भागातील दोन असे 14 अहवाल एंटीजेन पॉझिटिव्ह आले आहेत. आज आरटीपीसीआर पॉझिटिव्ह आलेल्यांमध्ये आमराई,  कसबा श्रीराम नगर, बुरुड गल्ली, पेन्सिल चौक, डायनामिक्स कॉलनी, कल्याणीनगर, सिद्धार्थनगर, निर्मिती विहार सोसायटी, देसाई इस्टेट, पंचायत समिती तर  ग्रामीण भागातून गवारे फाटा, मळद, सोनवडी सुपे, कारखेल, कोऱ्हाळे बुद्रुक, माळेगाव, सोमेश्वर, वडगाव निंबाळकर असे 29 रुग्ण व एंटीजेन पॉझिटिव्ह आलेल्यांमध्ये मुक्ती विहार सूर्यनगरी, प्रगतीनगर, देसाई इस्टेट, कसबा श्रीराम नगर, भंडारे हॉस्पिटलमागे, भिगवण रोड जळोची, दत्तकृपा अपार्टमेंट, गुणवडी व कऱ्हावागज येथील रुग्णांचा समावेश आहे.

Edited By - Prashant Patil