Baramati Hoarding : होर्डिंगच्या मुद्यावर बारामती नगरपालिका अँक्शन मोडवर...

बारामती शहरात उभारलेल्या विनापरवानगी होर्डिंग्जवर कारवाईस बारामती नगरपालिकेने प्रारंभ केला आहे.
Crime on Hoardings in baramati
Crime on Hoardings in baramatisakal

बारामती - शहरात उभारलेल्या विनापरवानगी होर्डिंग्जवर कारवाईस बारामती नगरपालिकेने प्रारंभ केला आहे. शहरातील हॉटेल चैत्रालीनजिक असलेले होर्डिंग नगरपालिका प्रशासनाने आज उतरवून टाकले.

मुंबईतील होर्डिंग दुर्घटनेनंतर राज्य शासनाने विनापरवानगी होर्डिंग्जबाबत कडक धोरण अवलंबण्याचा निर्णय घेतला आहे. या पार्श्वभूमीवर बारामती नगरपालिकेचे मुख्याधिकारी महेश रोकडे यांनीही शहरातील धोकादायक होर्डिंगवर कारवाईस प्रारंभ केला आहे. सर्व होर्डिंग्जवरील फ्लेक्स कालच उतरविण्यात आले होते. वादळामुळे या फ्लेक्सने अपघात घडू नये या उद्देशाने ही कारवाई करण्यात आली.

दरम्यान आज दोन होर्डिंग मालकांनी स्वताःहून होर्डिंग उतरविणार असल्याचे नगरपालिका प्रशासनाला सांगितलेले असून उर्वरीत होर्डिंगवरही नगरपालिका कारवाई करणार आहे. दरम्यान आज जे होर्डिंग नगरपालिकेने उतरविले आहे, त्याचा खर्च व तितकीच रक्कम दंड म्हणून संबंधितांच्या घरपट्टीमध्ये वाढवून ती त्यांच्याकडून वसूल केली जाणार असल्याचीही माहिती मुख्याधिका-यांनी दिली.

दरम्यान ज्या होर्डिंगधारकांनी होर्डिंग्ज लावलेले होते त्यांना पूर्वलक्षी प्रभावाने जाहिरात कराचीही नगरपालिकेने मागणी केलेली असल्याचेही मुख्याधिका-यांनी आज स्पष्ट केले. होर्डिंग उभारतानाच नगरपालिकेची रितसर परवानगी घेणे गरजेचे असताना बहुसंख्य जणांनी अशी परवानगीच घेतली नसल्याचे आता स्पष्ट झाले आहे.

गेले काही दिवस वळीवाच्या पावसाने वातावरण बदलले असून वादळ निर्माण होत असल्याने हा धोका अधिकच वाढल्याने नगरपालिका आता अँक्शन मोडमध्ये आहे.

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com