

बारामती, ता. १८ : येथील नगरपरिषदेच्या सर्वसाधारण सभेला मुहूर्त लागत नसल्याचे सोमवारी (ता.१८) पुन्हा एकदा स्पष्ट झाले. मागील सभा विधानसभेच्या आचारसंहितेमुळे तहकूब करावी लागली होती तर येत्या २० मे रोजी होणारी सभा देखील आता पुन्हा पुढे ढकलावी लागणार आहे.
बारामतीच्या विकासकामांवर आचारसंहितेचा विपरीत परिणाम होऊ लागल्याने आता निवडणूक आयोगाकडे नगरपरिषद प्रशासनाने दाद मागावी, अशी मागणी होऊ लागली आहे. या सभेत ७७ महत्वाच्या विषयांवर चर्चा होऊन निर्णय होणार आहेत.
भारत निवडणूक आयोगाने महाराष्ट्र विधान परिषदेच्या स्थानिक स्वराज्य संस्था मतदारसंघांतील द्वैवार्षिक निवडणूक कार्यक्रम जाहीर केला असून पुणे स्थानिक स्वराज्य संस्था मतदारसंघासाठीही निवडणूक प्रक्रिया सुरू झाली आहे. निवडणूक कार्यक्रम जाहीर होताच बारामतीत आचारसंहिता तत्काळ प्रभावाने लागू केली आहे. त्यामुळे आता नगरपरिषदेची सभाही घेता येणार नाही.
वास्तविक अर्थसंकल्पाची एकमेव सभा वगळता गेल्या सहा महिन्यात नगरपरिषदेची सर्वसाधारण सभाच होऊ शकलेली नाही. डिसेंबर २०२५ मध्ये नगरपरिषदेचे नगरसेवक निवडून गेले, त्यानंतर जानेवारी महिन्यात उपमुख्यमंत्री अजित पवार यांचे दुर्देवी निधन झाले. त्या नंतर अर्थसंकल्पीय एक सभा झाली, त्या पाठोपाठ विधानसभेची आचारसंहिता लागली व आता २० मे रोजी सर्वसाधारण सभा आयोजित केली असतानाच विधानपरिषदेची आचारसंहिता लागल्याने सभा तहकूब करण्याची पाळी प्रशासनावर आली आहे.
जिल्हाधिकारी यांच्याकडे सभा घेण्यासाठी परवानगी मागितली होती. प्रत्यक्षात ती परवानगी त्यांनी न दिल्याने सभा तहकूब करावी लागल.
- सचिन सातव, नगराध्यक्ष, बारामती नगरपरिषद
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.