

Baramati News Shocking Crime Against Minor Girl Repeated Sexual Assault Case Exposed After Victim Becomes Pregnant
esakal
वडगाव निंबाळकर : अल्पवयीन मुलीला आणि तिच्या कुटुंबीयांना जीवे मारण्याची धमकी देऊन तिच्यावर वारंवार लैंगिक अत्याचार केल्याचा गंभीर प्रकार वडगाव निंबाळकर पोलिस ठाण्याच्या हद्दीत उघडकीस आला आहे. या अत्याचारातून मुलगी गर्भवती झाल्यानंतर प्रकरण समोर आले. याप्रकरणी सतीश मोहिते (रा. निरगुडवाडी, ता. बारामती) याला पोलिसांनी अटक केली आहे.