

Pune Rural Police Solve Baramati Robbery and House Burglary Cases Recover Gold Ornaments Worth 230000 and Washing Machine
esakal
-चिंतामणी क्षीरसागर
वडगाव निंबाळकर : जबरी चोरी आणि घरफोडीच्या दोन स्वतंत्र गुन्ह्यांचा छडा लावण्यात वडगाव निंबाळकर पोलिसांना यश आले आहे. पुणे ग्रामीण स्थानिक गुन्हे अन्वेषण शाखेच्या मदतीने पोलिसांनी केलेल्या या कारवाईत दोन्ही गुन्ह्यांतील मुख्य संशयितांना अटक केली आहे. जबरी चोरीच्या गुन्ह्यात दोन लाख ३० हजार रुपये किमतीचे सोन्याचे दागिने, तर घरफोडीच्या गुन्ह्यात चोरीला गेलेली वॉशिंग मशीन हस्तगत करण्यात आली आहे. दोन्ही गुन्ह्यांतील एका विधिसंघर्षग्रस्त बालकासह अन्य सहा आरोपी फरार असून त्यांचा शोध सुरू आहे.