
Crime News: शिक्षीकेच्या फसवणूक प्रकरणी बारामतीत दोघांवर गुन्हा
बारामती : नेतेमंडळीशी ओळख आहे, तुम्हाला पदोन्नती मिळूवन देतो असे सांगत एका शिक्षीकेला फसविणा-या डॉ. कृष्णा शेषराव जेवादे (रा. बारामती) व सोमनाथ इंगळे (रा. सोमवार पेठ, फलटण, जि. सातारा) यांच्याविरुध्द शहर पोलिसांनी गुन्हा दाखल केला आहे. या प्रकरणी स्मिता विश्राम वाघोले (रा. राऊ कॉलनी, काळेपडळ, ह़डपसर, पुणे) यांनी फिर्याद दाखल केली आहे.
विरोधी पक्षनेते अजित पवार, खासदार सुप्रिया सुळे व तत्कालिन शिक्षणमंत्री वर्षा गायकवाड यांच्याशी ओळख आहे, असे सांगून जेवादे व इंगळे यांनी त्यांचा विश्वास संपादन करत तीन लाखांची फसवणूक केली. त्यांनी दहा लाखांची मागणी केली होती, त्या पैकी तीन लाख रुपये वाघोले यांनी त्यांना फोनपे द्वारे पाठविले होते.
त्यानंतर पुण्यात दीड लाख रोख व पुन्हा साडेपाच लाख रुपये बारामतीत घेतले. तुमचे काम नाही झाले तर पैसे परत करतो असेही जवादे याने सांगितले होते. प्रत्यक्षात काम न झाल्याने वाघोले यांनी संपर्क केल्यानंतर त्याने उडवाउडवीची उत्तरे दिली. वाघोले यांनी थेट अजित पवार यांच्या कार्यालयाकडे धाव घेत ही बाब निदर्शनास आणून दिल्यानंतर या दोघांविरुध्द गुन्हा दाखल करण्याच्या सूचना पोलिसांना देण्यात आल्या. त्या नुसार त्यांच्याविरुध्द गुन्हा दाखल करण्यात आला आहे.