
बारामती : येथील बारामती सायकल क्लब, नाशिक सायकलिस्ट फाउंडेशन तसेच पंढरपूर सायकलर्स क्लब यांच्या पुढाकाराने घेतलेले आणि लातूर सायकलिस्ट फाउंडेशन यांच्या सहकार्याने पंढरपूर नगरप्रदक्षिणा सायकल रिंगण सोहळा आणि सायकलवारी संमेलन पंढरपूर येथे पार पडले. आषाढी एकादशीच्या पार्श्वभूमीवर गेल्या चार वर्षांपासून हा उपक्रम राबविला जातो.