esakal | Baramati: भरदिवसा महिलेच्या गळ्यातील मंगळसूत्र हिसकावले
sakal

बोलून बातमी शोधा

बारामती : भरदिवसा महिलेच्या गळ्यातील मंगळसूत्र हिसकावले

बारामती : भरदिवसा महिलेच्या गळ्यातील मंगळसूत्र हिसकावले

sakal_logo
By
मिलिंद संगई, बारामती

बारामती : पतीसोबत दुचाकीवरुन निघालेल्या महिलेच्या गळयातील मंगळसूत्र भरदिवसा वर्दळीच्या रस्त्यावरुन हिसकावण्याइतपत चोरट्यांची मजल बारामतीत गेली आहे. पोलिसांचा धाक राहिला आहे की नाही अशी स्थिती व्हावी अशी घटना शनिवारी (ता. 2) बारामतीत घडली. पतीसोबत दुचाकीवरुन जातानाही जर चोरटे मंगळसूत्र चोरत असतील तर बारामतीत नेमके काय सुरु आहे याचीच बारामतीत चर्चा होती.

या घटनेत मंगळसूत्राचा सुमारे वीस हजारांचा भाग चोरट्यांनी चोरुन नेला. शनिवारी (ता. 2) ही घटना घडली. या संदर्भात सुशील प्रदीप निंबाळकर (रा. मोतीबाग, बांदलवाडी, बारामती) यांनी फिर्याद दिली आहे. मुलाला दवाखान्यातून घरी नेत असताना सुशील व त्यांची पत्नी यांच्या दुचाकीसोबत समांतर दोन युवक दुचाकी चालवत होते. निंबाळकर यांच्या पत्नीच्या गळ्यातील मंगळसूत्र या दुचाकीवर बसलेल्या चोराने हिसकावून ते पळून गेले. या प्रकाराने धक्का बसल्याने त्यांच्या पत्नी गाडीवरुन खाली पडल्या. यात अर्धेच मंगळसूत्र चोरट्यांच्या हातात लागले.

हेही वाचा: पिंपरीत फायनान्स कंपन्यांच्या विरोधात रिक्षाचालकांचे निदर्शने

याच दिवशी रात्री पावणे दहाच्या सुमारास टी. सी. कॉलेजच्या मागील बाजूला अर्चना गणेश आगवणे (रा. अौद्योगिक वसाहत, बारामती) यांच्याही दुचाकीच्या पाठीमागे पाठलाग करत त्यांच्या गळ्यातील हिसकावण्याचा प्रयत्न दोघा चोरट्यांकडून झाला मात्र यात त्यांना मंगळसूत्र हिसकावता आले नाही.

loading image
go to top